सावधान! मुलांसाठी खेळणी घेताय? तर आधी हे वाचाच esakal
आपण साधारणपणे लहान मुलांची खेळणी हलकेच घेतो पण आपण लहान मुलांच्या आरोग्याची काळजी करत असेल तर आपण तसे करू नये. जनरल एनव्हायर्नमेंटल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, मुलांच्या खेळण्यांमध्ये विषारी रसायनाचा वापर होण्याच्या धोक्याविषयी चेतावणी देण्यात आली आहे. अभ्यासात म्हटले आहे की, जर आपण शक्य तितक्या लवकर धोकादायक रासायनिक ऑर्गनोफॉस्फेट एस्टर (ओपीई) पासून बनवलेली खेळणी किंवा इतर उत्पादनांचा वापर बंद केला नाही तर भविष्यातील पिढ्यांच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.
बाजारात विकल्या जाणाऱ्या खेळण्यांमध्ये ऑर्गनोफॉस्फेट एस्टर (ओपीई) वापरले जात असल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून दिसून आले आहे. याशिवाय हे केमिकल मोबाईल फोन किंवा वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये वापरले जात आहे, तर हे एक अतिशय विषारी केमिकल असून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ऑर्गनोफॉस्फेट एस्टरच्या संपर्कात आल्यामुळे विविध प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हेच कारण आहे की अनेक देशांनी खेळण्यांमध्ये या केमिकलचा वापर कंट्रोलमध्ये केला आहे.अभ्यासानुसार, ऑर्गनोफॉस्फेट एस्टर (ओपीई) च्या प्रदर्शनामुळे आयक्यू लेव्हल, एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर या केमिकलमुळे कॅन्सरसारख्या गंभीर समस्यांनाही सामोरे जावे लागते, तसेच प्रजननक्षमतेशी (फर्टिलिटी) संबंधित समस्या वाढू शकतात.अभ्यासामधून चेतावणी दिली आहे की, जर ऑर्गनोफॉस्फेट एस्टरचा वापर केवळ खेळण्यांमध्येच नव्हे तर स्मार्टफोन, टीव्ही आणि वाहनांमध्ये कंट्रोल केला गेला नाही तर भविष्यात त्याचे गंभीर नुकसान सहन करावे लागेल. स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ओपीई हात किंवा चेहऱ्याद्वारे शरीरात ट्रान्सफर होऊ शकतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.