kokan sakal
फोटोग्राफी

कोकणातील पारंपारिक लोककला...

पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळलाआहे.

तेजस भागवत

कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले खरे खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी इथला शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी / मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातल्या या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत.

दशावतार - विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, कलकी आणि बुद्ध यातील फक्त #वामन, #परशूराम, #राम आणि #कृष्ण हे चारच अवतार नाटकात दाखवले जातात. आधी गणपतीस्तवन, मग पुर्वरंगात रिद्धी सिद्धी, भटजी, संकासूर, सरस्वती, ब्रम्हा, विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात #रामायण, #महाभारत मधील पौराणिक कथा दाखवली जाते. महत्वाचं म्हणजे दशावतारी नाटकांची लिखित संहिता नसते, स्वतःची रंगभूषा करायला सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर कोणते कथानक करायचे हे कलाकारांना सांगितले जाते. त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचे संवाद तयार करतात.
नमन - नमन या लोकनृत्यामध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पूजनात गणेशाची आख्यायिका असते .नमन खेळाची सुरुवात गावदेवीची राखण देऊन मृदंगावर थाप पडते. ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे साधन मात्र नमन-खेळे, शक्तीतुरा हेच आहेत.
पालखी नृत्य - फाल्गुन शुक्ल पंचमी ते हुताशनी पौर्णिमा या दिवसामध्ये कोकणातील लहान मोठ्या गावांमध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी काढण्याची प्रथा असते. या पालखीमध्ये ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा ठेवल्या जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी निघते. गावातील प्रत्येक वाडीमध्ये, घरासमोरून नाचवली जाते. सहाण म्हणजे गावाची चवडीची पण देव कार्याची जागा निवडली जाते. या ठिकाणी केवळ पालखीच्या कार्यक्रमादरम्यान देवकार्य केले जाते. प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचा दिवस वेगवेगळा असतो. या पालखी नाचवण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबई, पुण्यातून कोकणात आपल्या गावी जातात.
संकासूर - गावाची वेस बदलत गेलं की, संकासूराच्या रुपड्यात किंचित किंचित फरक जाणवतो, पण संकासूर पहावा तो गुहागरचाच! त्याच्या कमरेच्या घुंगराचा चाळच चार किलो वजनाचा असतो. हातातली वेठी, आणि त्याचा नाच टक लावून पाहत रहावे असा. मानेला आणि कमरेला लचके देत तो दुडक्या चालीवर मागेपुढे करत नाचतो, ते पाहत राहण्यासारखे असते. आपली सखी गोमूसोबत तो नाचत असतो, कधी गोमूभोवती अक्षरश: तीच्याभोवती गोल गोल पिंगा घालतो. असा हा संकासूर लहानग्या पोरांपासून म्हातार्‍या-कोतार्‍यापर्यंत सार्‍यांनाच जीवाभावाचा वाटत आलेला आहे. कोकणातल्या शिमगोत्सवात तो कशासाठी येतोय..? काय आहे त्याचं सांगणं..? बापरे! असे एक ना अनेक प्रश्न.. पण, कोकणवासियांनी या प्रश्नांचा शोध कधी घेतलाच नाही. ते फक्त अविरत प्रेम करत राहिले संकासूरावर... आणि त्यांचं ते प्रेम पाहून मत्स्य पुराणात खलनायक असलेला हा संकासूर कोकणवासियांचा हिरो झाला.
जाखडी - मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते. सर्वत्र `बाल्या नृत्य` किंवा `चेऊली` म्हणून परिचित असणारा हा नृत्यप्रकार रत्नागिरीत मात्र `जाखडी` लोकनृत्य म्हणून जास्त परिचित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

SCROLL FOR NEXT