Korean Tea  google
फोटोग्राफी

कोरियन चहा प्या... प्रतिकारशक्ती वाढवा!

सहा प्रकारच्या चहांमुळे तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्याबरोबर इतरही फायदे होतील

भक्ती सोमण-गोखले

जर तुम्हाला रोजरोज तोच चहा पिऊन थोडासा कंटाळा आला असेल तर तुम्ही थोडा बदल करू शकता. सध्या लोकांना कोरियन (Korean) फिवर चढलाय. कोरियन ड्रामा, के-पॉप डाएट, कोरियन लाईफस्टाईल (Lifestyle) अवलंबण्याकडे अनेकांचा कल आहे. किमची आणि रामेन हे पदार्थ तर आता लोकप्रिय होत आहेत. पण जर तुम्हाला काही वेगळा चहा (Tea) प्यायची खरोखरच इच्छा असेल तर तुम्ही कोरियन चहा नक्की पिऊ शकता. हा चहा प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढेलच शिवाय वजन कमी होईल. सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल. त्यामुळे या प्रकारचे चहा प्यायचा विचार करा.

ओमिजा टी (Omija tea)- हा चहा ओमजा बॅरीपासून तयार केला जातो. तसेच तो मध घालून प्यायला दिला जातो. तसेच मूगसुद्धा चवीसाठी यात घातले जातात. ओमिजा म्हणजे पाच फ्लेवर्स. या चहाच्या प्रकारात औषधी गुणधर्म असल्याने सर्दी खोकला झालेल्यांसाठी तो उपयुक्त ठरतो. तसेच यकृतासाठीही हा चहा चांगला आहे.
क्रायसॅन्थेमम टी (Chrysanthemum tea) - हा आणखी एक लोकप्रिय चहा आहे. फुले सुकवून ती मधात काही महिन्यासांठी भिजवून ठेवली जातात. त्यानंतर ती गरम पाण्यात उकळवली जातात. तयार झालेला हा किंचित गोड चहा थंडीत जास्त प्रमाणात वापरला जातो.
सिट्रोन टी (​Citron tea) - हा चहा युझू फळाच्या प्रिझर्व्ह केलेल्या स्लाईसमधून बनविला जातो. त्याचे पातळ काप मधात घोळवून ठेवले जातात. मध स्लाइस टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच चहाला गोड चव आणण्यास मदत करते. सर्दी-खोकल्यासाठी हा चहा उपयुक्त आहे.
कॉर्न टी (Corn tea) - वजन कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे. हा चहा वाळवलेल्या कॉर्न कर्नल्स (dried corn kernels) आणि कॉर्न सिल्क (corn silk) पासून तयार केला जातो. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिणे अत्यंत उपयुक्त आहे.
युल्मू-चा-टी (Yulmu-cha tea) हा चहा जॉब्स टिअर टी म्हणून ओळखला जातो. हा चहा अक्रोड, बदाम, काळे सोयाबीन, काळे तीळ, कॉर्न, ब्राऊन राईस आणि भरपूर साखर याच्या मिश्रणातून केला जातोय कोरियामध्ये उच्च प्रथिनं असलेला चहा म्हणून हा मानला जातो.
ग्रीन प्लम टी (Green Plum tea)- उन्हाळ्याच्या दिवसात कोरियात या चहाचा आनंद घेतला जातो. यामुळे आतडे निरोगी राहते. गोड मेसिल सिरपमध्ये मनुका घालून आंबवतात. हे पेय ताजेतवाने बनवण्यासाठी पाणी घालतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात गरम पाणीही घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT