Kangaroo found in West Bengal Sakal
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीच्या डबग्राम वन परिक्षेत्रातील फराबारी-नेपाळी बस्टी येथून काल रात्री आणखी एका कांगारूची वनाधिकाऱ्यांनी सुटका केली होती. 1 एप्रिल रोजी दोन कांगारूंची सुटका करण्यात आली होती. (Two more kangaroos found in West Bengal; Mystery remains)
पश्चिम बंगालच्या वन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री जलपाईगुडीतील गजोलडोबाजवळ दोन जखमी कांगारूंची सुटका केली. गस्तीदरम्यान हे कांगारू सापडल्याचं बैकुंथुपूर वनविभागांतर्गत बेलाकोबा वनक्षेत्राचे वनरक्षक संजय दत्ता यांनी सांगितले.अधिकाऱ्यांना दोन्ही कांगारूंच्या शरीरावर काही गंभीर जखमा आढळल्या, त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्यात आले. विशेष अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे आरओने सांगितले.
हे कंगारू येथे कसे आले याचा शोध चालू असल्याचे वनरक्षक एस दत्ता यांनी सांगितले. त्यांना इथं आणण्यामागचं कारण काय, याचाही तपास चालू आहे.
मार्चमध्ये पश्चिम बंगाल पोलिसांनी कांगारूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी हैदराबादमधून दोन जणांना अटक केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 7,000 किमी प्रवास करून कांगारू मिझोराममध्ये कसे पोहोचले हे अद्याप एक कोडे आहे.
कांगारू हा ऑस्ट्रेलियात आढळणारा सस्तन प्राणी आहे. हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. हा प्राणी फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. कांगारू भारतात आढळत नाहीत. फक्त काही प्राणीसंग्रहालयांमध्ये कांगारू आहेत.
जून 2011 मध्ये, कोलकाता येथील अलीपूर प्राणीसंग्रहालयाने झेक प्रजासत्ताकातून लाल कांगारूंच्या दोन जोड्या आणल्या होत्या पण ते सर्व मरण पावले. शेवटचा लाल कांगारू ऑक्टोबर 2015 मध्ये मरण पावला. त्यानंतर 2016 मध्ये कोलकाता प्राणीसंग्रहालयाला योकोहामा प्राणीसंग्रहालयातून चार इस्टर्न ग्रे कांगारू मिळाले.
कांगारू हे शाकाहारी, मार्सुपियल प्राणी आहेत जे सस्तन प्राण्यांमध्ये त्यांच्या प्रकारात अद्वितीय आहेत. सन १७७३ मध्ये कॅप्टन कुकने त्यांना पाहिले आणि तेव्हाच ते पहिल्यांदा लोकांसमोर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.