marriage ceremony esakal
फोटोग्राफी

चाळीशीनंतर दुसरं लग्न ! जोडीदाराकडून काय असतील अपेक्षा ?

चाळीशी ओलांडल्यावर भिती वाटणे साहजिक आहे

भक्ती सोमण-गोखले

चाळीशीनंतर नव्या प्रवासाची सुरूवात करताना निगेटिव्ह होण्यापेक्षा धैर्याने या प्रसंगाला सामोरे जा.

ज्यांचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही त्यांच्यासाठी दुसरे लग्न हे खूप अवघड असू शकते. अशा लग्नाविषयी (Marriage ) मनात वेगवेगळे विचार येणे साहजिक आहे. तुम्ही चाळीशी (After 40) ओलांडल्यावर भिती वाटणे साहजिक आहे. पण न घाबरता तुम्ही तुमचा आनंद शोधणे गरजेचे आहे. म्हणून चाळीशीनंतर नव्या प्रवासाची सुरूवात करताना निगेटिव्ह होण्यापेक्षा धैर्याने या प्रसंगाला सामोरे जा. पण तुमच्या अपेक्षा काय असतील त्याचा आधी विचार करा.

तुलना करू नका (Comparisons)- तुम्ही तुमच्या नव्या जोडीदाराची जुन्या जोडीदाराशी तुलना करू नका, ही गोष्ट सामान्य आहे की, तुम्ही भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तुलना आधीच्या पार्टनरशी करत असाल. तसा बेंचमार्क लावू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुम्ही सकारात्मक विचार केलात तर असे लक्षात येईल की, नवा जोडीदार आधिच्यापेक्षा पूर्ण वेगळा असू शकतो.
जबाबदाऱ्या(Responsibilities)- तुम्ही चाळीशीनंतर दुसरं लग्न करताय. त्यामुळे तिशीच्या आत लग्न झाल्यावर जो उत्साह असतो. तो यावेळी असेलच असे नाही. तुम्ही आता कुठलीही गोष्ट जबाबदारीने करणार आहात, भविष्यात जे काही करणार आहात त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन यशस्वी करायचे असेल तर ही संधी आहे. ती मनापासून स्विकारा.
सेक्सनंतर महिलांना बोलायला आवडतं का? (Do women really like to talk after sex)- चाळीशीनंतर तुम्ही प्रामाणिकपणाचे जोरदार समर्थन करू शकता. पणजोडीदारासमोर लागेल असे स्पष्ट बोलू नका. जर, तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असल्यास जोडीदाराशी शांतपणे बोला.
विचारात फरक (Differences)- तुमच्या दोघांचे विचार, मत, दृष्टीकोनात मोठा फरक असू शकतो. पण तुम्ही त्याचा आदर केला तर तुमचे नाते आणि वैवाहिक जीवन अधिक घट्ट होईल. मग तुम्ही हा फरक साजरा करू शकता.
तडजोड करा (Compromises) नाते जपताना तुम्हाला एक-दोन वेळा तडजोड करावी लागू शकते. तसे असल्यास ठीक आहे. पण, तुम्ही दोघे सतत कुठल्या ना कुठल्या मुंद्यांवरून भांडत असाल, तर थोडीशी तडजोड करून एकमेकांच्या समस्या सोडवण्याच्या दिशने काम करा. असे केल्याने तुमचे नाते वाढण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या युवा नेत्यासह ३ मित्रांचा मृत्यू; लग्नसोहळ्याहून परतताना भीषण अपघात, कारचा चुराडा

नव्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं काम लवकरच सुरू होणार, अटल सेतू थेट पुणे रिंगरोडला जोणार; गडकरींनी दिली माहिती

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

SCROLL FOR NEXT