World Sparrow Day 2022 Esakal
सांगली: अंगणात दिसणारी चिऊताई (Sparrow) आता दिसेना झालीय. तिला वाचवण्यासाठी प्राणीमित्रांसह साऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. जागतिक चिमणी दिनानिमित्त (World Sparrow Day 2022) चिउताईला वाचवण्यासाठी तमाम सांगलीकरांनी चित्र रेखाटत साद घातली. निमित्त होते चित्रकला स्पर्धेचे. शहरासह परिसरातील अठरा शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. याचे सर्व छायाचित्रण संकलित केले आहे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी.
अंगणात दिसणारी चिऊताई आता दिसेना झालीय. तिला वाचवण्यासाठी प्राणीमित्रांसह साऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. जागतिक चिमणी दिनानिमित्त चिउताईला वाचवण्यासाठी तमाम सांगलीकरांनी चित्र रेखाटत साद घातली. चिमण्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे लहान मुलांना चित्रातच चिमणी दाखवावी लागते. सिमेंटच्या जंगलात चिमण्यांच्या घरट्यांना जागाच राहिली नाही. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. निसर्गचक्रातील चिमण्यांचे महत्त्व मोठे आहे. चिमण्यांचे अस्तित्व जिवंत ठेवावे, त्यांची संख्या वाढण्यासाठी उपाययोजना कराव्यात म्हणून अनेक निसर्गप्रेमी धडपड करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जागतीक चिमणी दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.महावीर उद्यानात या घेण्यात आलेल्या स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष होते. अठरा शाळेतील १२०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. पालकांनीही सहभाग नोंदवला. पाचवी ते सातवी गटासाठी पर्यावरणामधील पक्ष्यांचे स्थान असा विषय देण्यात आला होता. अनेक विद्यार्थ्यांनी स्वच्छता दुत म्हणून काम करणाऱ्या पक्षाचे चित्र रेखाटले. आठवी ते दहवीच्या गटासाठी मी आणि पर्यावरण असा विषय देण्यात आला होता. पर्यावरण रक्षणासाठी उपायोजनांवर भाष्य करणारे चित्रे रेखाटण्यात आली होती. खुल्या गटासाठी इको फ्रेंडली सिटी हा विषय होता. आपली सांगली किती चांगली यावर अनेकांनी चित्रे रेखाटली. विजेत्यांना वनविभाग, खोपा बर्ड हाऊसतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईँटचा साऱ्यांनी आनंद लुटला.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कागदावर नव्हे तर चक्क चिऊताईच्या कृत्रिम घरट्यावर चित्र रेखाटली. ती त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आली. यानिमित्ताने शहरात दीड हजार ठिकाणी चिऊताईला हक्काचा निवारा मिळणार आहे.
ती घरटी कशा पद्धतीने आणि कोठे लावायची याची शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली. या कृत्रिम घरट्यासाठी ईगल डिजीटलचे संचालक रावसाहेब मोरे यांनी पुढाकार घेतला.
‘खोपा’चे सचिन शिंगारे, सुनीता शिंगारे, आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, पक्षी तज्ज्ञ शरद आपटे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, बसवराज पाटील यांनी माहिती दिली. वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, योगेश रोकडे, वनविभागाचे निलम बामणे, सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, सुधीर सोनावणे, विलास काळे, विजय कोळेकर, नवनाथ लाड यांची उपस्थिती होती. इन्साफचे मुस्तफा मुजावर, ॲनिमल सहाराचे अजित काशीद, तक्षीला शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, डब्ल्युआरसी ग्रुपचे सचिन साळुंखे व यांच्या टीमने संयोजन केले.
चित्र रेखाटण्यात मग्न असणारी विद्यार्थीनी.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.