bikes seized by the crowd to the Shanipet police. esakal
जळगाव

शनिपेठेत तरुणावर अज्ञातांचा हल्ला; दंगलीच्या अफवेने पोलीस चौकीमध्ये जमाव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस भिलपुरा ते ममुराबाद रोडवरील लेंडीनाला पुलादरम्यान काही दिवसांपासून ठराविक समुदायावर हल्ले होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक पोलिस ठाण्यासह पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने रविवारी (ता. २५) सायंकाळी शनिमंदिरासमोरच तरुणावर हल्ला झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

शहरातील शिवाजीनगरच्या विस्तारित भाग असलेल्या उस्मानिया पार्क ते थेट केजीएननगरपर्यंतच्या भागातील रहिवाशांचा वापर ममुराबाद रोडवरूनच आहे. शहरात येण्यासाठी लेंडीनाला पुलाखालून शनिपेठमार्गे भिलपुरा आणि बाजारात येण्यासाठी या मार्गाचा वापर येथील रहिवासी करत असतात.(1 youth attacked by unknown persons in Shanipet; Crowd in Police Station on rumors of riots

Nashik)

मात्र, काही समाजकंटकांकडून तीन-चार महिन्यांपासून सतत त्रास दिला जात असून, अंगात पांढरेशुभ्र कपडे, डोक्यावर टोपी, दाढी असलेल्यांना गाठून त्यांच्या अंगावर लेंडी नाल्याची घाण फेकून वाद घातला जातो, समोरील व्यक्ती जाब विचारत असतानाच त्याला तीन-चार आडदांड तरुण येऊन बेदम मारहाण करत पसार होतात असाच प्रकार एका महिला प्राध्यापकासोबतही झाला असून, या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून दोन्ही पक्षांची समजूत घालून प्रकरण आपसात मिटविण्यात आल्याने राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे जिल्‍हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत याबाबत २३ ऑगस्टला कारवाई संदर्भात निवेदनही देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्यावर कुठलीच ठोस कारवाई झालेली नसल्याने रविवारी दुपारी शनिपेठ परिसरात पुन्हा हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याने दोन समुदायांत तणावाचे वातावरण पसरले आहे.

काय घडले तरणावाचे कारण?

उस्मानिया पार्क परिसरातील रहिवासी तरुण तौसिफ शेख फारुख (वय २०) बाजारात येत असताना ममुराबाद पुलाजवळून पिवळ्या रंगाची दुचाकी त्याचा पाठलाग करत आली. शनिमंदिरासमोर त्याला कुठलेही कारण नसताना खाली पाडत बेदम मारहाण करण्यात आली. विनाकारण मारहाण होत असल्याचे पाहून काट्याफैल, भिलपुरा परिसरातील तरुणांचा जमाव या ठिकाणी येत असल्याचे पाहून मारहाण करणाऱ्यांनी वाहने सोडून पळ काढला. जमावाने ही वाहने शनिपेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर दादू नावाच्या तरुणाचे नाव समोर आले. मात्र कारवाई कोणावरच झाली नसल्याने शनिपेठ पोलिसांत मोठा जमाव एकवटला होता.

पोलिस ठाण्यात मांडवली

शनिपेठेत दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी तरुणाला काहीएक कारण नसताना घेरून मारहाण करण्यास सुरवात केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. समोरून भिलपुरा, काट्याफैलमध्ये घटनेची माहिती मिळाल्याने त्या बाजूने तरुण शनिपेठेच्या दिशेने धावत येत असल्याचे बघून मारहाण करणाऱ्यांनी त्यांची वाहने सोडून पळ काढला. ही वाहने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. मात्र, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी २५ हजारांच्या नुकसानभरपाईवर आपसात प्रकरण मिटविल्याचे सांगण्यात आले.

अप्रिय घटनेचे संकेत

शहरातील बेंडाळे चौक, नेरी नाका चौकात अशाच प्रकारे एकट्यादुकट्या तरुणांना, वयोवृद्धाला त्याच्या अंगावरील कपड्यांवरून मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तसाच प्रकार ममुराबाद रोडवरील लेंडीनाला पुलादरम्यान घडत असल्याने दोन समुदायांत यातून दंगल उसळून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT