Varkhede (Chalisgaon): Wildlife guard Rajesh Thombre, forest guard Sanjay Chavan and forest staff with the captured python esakal
जळगाव

Jalgaon : शिवारात आढळला 10 फूट लांबीचा अजगर; वन्यजीव रक्षकांच्या मदतीने सोडले जंगलात

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे एका उसाच्या शेतात सुमारे १२ किलो वजनाचा १० फुटांचा अजगर ऊसतोड मजुरांना आढळला. या घटनेची माहिती मिळताच वन्यजीवन रक्षक राजेश ठोंबरे व वनकर्मचाऱ्यांनी अजगराला पकडून गुरुवारी (ता. १०) रात्री पाटणादेवी अभयारण्यात सोडून देत जीवदान देण्यात आले.

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील अशोक प्रतापसिंग पवार यांच्या प्लॉट भागालगत शेतजमीन असून याठिकाणी ऊसतोड सुरू आहे. ऊसतोड करणाऱ्या कामगाराच्या मुलाला गुरुवारी (ता.१०) उसात अजगर दिसला.(10 feet long python found in Shivar Released in wild help of wildlife guard Jalgaon News)

त्याने ही घटना वडिलांना सांगितली. त्यानंतर सर्व ऊसतोड कर्मचाऱ्यांनी अजगराकडे धाव घेतली. शेतात अजगर आढळल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. यावेळी गावातील एका तरुणाने शिताफीने अजगराला १४ ते १५ फुटाच्या पीव्हीसी पाइपमध्ये बंदिस्त केले.

या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनरक्षक संजय चव्हाण, राहुल मांडोळे, समाधान मराठे यांनी घटनास्थळी येत धाव घेत पाइप कापून अजगराला बाहेर काढले. त्यानंतर रात्री सुरक्षितपणे पाटणा अभयारण्यात या अजगराला सोडण्यात आले. वरखेडे शिवारात पहिल्यांदाच उसाच्या शेतात अजगर आढळून आल्याने अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT