While publishing the plan of Jalgaon district proposed by NABARD, Collector Ayush Prasad, G.P. CEO Ankit, Superintendent of Police M. the prince etc. esakal
जळगाव

Jalgaon News: जिल्ह्याचा 11 हजार कोटींचा वित्त पुरवठा आराखडा; नाबार्ड’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन २०२४-२५ साठीचा १० हजार ९५७ कोटी ८ लाखांच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५ ) तयार केला आहे. या आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी अमित कुमार , जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रणव झा, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प व्यवस्थापक आर.एस. लोखंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रबंध निदेशक जितेंद्र देशमुख सर्व बँकांचे प्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते. (11 thousand crore financing scheme in district by NABARD jalgaon news)

‘नाबार्ड’तर्फे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पी एल पी) हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून याचा वापर केंद्र सरकार, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालय, देशातील सर्व बँकाकडून संदर्भासाठी केला जातो.

तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘नाबार्ड’ द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा आधारभूत मानून जिल्हा अग्रणी बँक जिल्ह्याची वार्षिक पत-पुरवठा योजना (District Credit Plan) तयार करते आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांना विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले जातात.

नाबार्डतर्फे प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा बँकिंग प्रणालीद्वारे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडते. या आराखड्यात सन २०२४-२५साठी जळगाव जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५) १०९५७.०८ कोटी रुपयांचा आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत सर्व बँकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी याप्रसंगी केले.

जळगाव जिल्ह्यात बँकांनी पात्र पशुपालक व मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्याने वित्त पुरवठा करावा. त्यांना किसान क्रेडिट कार्ड चा लाभ द्यावा, घर घर केसीसी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी च्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

अशी आहे प्रस्तावित तरतूद

- शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी ६९१२.५० कोटी

- सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी ३२९७०.६३ कोटी

- इतर प्राथमिक क्षेत्रासाठी १०७३.९६ कोटी प्रस्तावित केले

- शेतीपूरक क्षेत्रात पीक कर्जासाठी ३९९०.४४ कोटी

- सिंचनासाठी २६५.७८ कोटी

- शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी १८३.६६ कोटी

- पशुपालन (दुग्ध) ३१३.०९ कोटी

- कुक्कुटपालन १७१.८३ कोटी

- शेळी- मेंढी पालनासाठी ३०२.१७ कोटी

- गोदाम/शीतगृहासाठी ११८.६४ कोटी

- भूविकास, जमीन सुधारणा ११५.३५ कोटी

- शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी ७८५.५७ कोटी

- प्राथमिक क्षेत्रामध्ये गृह कर्ज ४८८.६० कोटी

- शैक्षणिक कर्ज रुपये ३८.७५ कोटी

- महिला बचत गट इतरसाठी ४९४.८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT