Demand for notebook is increase in Diwali esakal
जळगाव

Diwali Update : दरात 15 ते 20 टक्के वाढ; व्यापारी बांधवांची वह्यांना मागणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : व्यापारी संगणकावर सर्व व्यवहार करीत असले, तरी दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी संगणकासह खतावणी, चोपड्यांचे पूजन करण्याची परंपरा कायम आहे. यामुळेच यंदाही वहीपूजनासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वह्या, चोपड्या, बोरू, टाक, लेजर बुक, कॅश बुक, रोजमेळ, हातपट्टी रजिस्टर आदींची मंगळवारी (ता. १८) मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वह्यांच्या खरेदीचा मुहूर्त (पुष्य नक्षत्र) होता. कागदाचे दर वाढल्याने वहीपूजनासाठी लागणाऱ्या वह्यांच्या किमतीत पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे.(15 to 20 percent rate Hike Demand for books by businessmen is more Jalgaon News)

आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असले, तरी दिवाळी ते दिवाळी असा हिशेब ठेवण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. यामुळे दिवाळीत अकाउंट लिहिण्यासाठीच्या वह्यांची खरेदी मंगळवारी करण्यात आली.

चोपडा वह्या २२५ ते ५५० दरम्यान उपलब्ध आहेत. मोठी वही २८० ते ८०० दरम्यान आहे. यावर बोरू आम्ही मोफत देतो, अशी माहिती विद्याधन बुक हाउसचे जितेंद्र वाणी यांनी दिली.

संगणकाचे युग असल्याने सर्व व्यवहार संगणकावर केले जातात. असे असले तरी वहीपूजनाला दिवाळीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजचा जमाखर्च, उधारी लिहिण्यासाठी वह्यांचा उपयोग केला जातो. पुष्य नक्षत्र, धनत्रयोदशी, श्री लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा या दिवशी वह्या खरेदीचा मुहूर्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, सख्ख्या भाच्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; महापालिकेच्या रिंगणात उतरणार

Akola Municipal Elections : युती, आघाड्या अडल्या, तिकीट वाटप रखडले, राजकारण तापलं; अकोल्यात नेमकं घडतंय तरी काय?

Nagpur Theft : नागपूरमध्ये डिलिव्हरी बॉयकडून महागडे पार्सल लंपास; २२.३४ लाखांचा अपहार; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

31st December Trip: लांब कुठं न जाता, मनोरीमध्ये 31 डिसेंबरचा परफेक्ट प्लॅन करा आणि निसर्गरम्य न्यू इअरचा अनुभव घ्या!

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

SCROLL FOR NEXT