Crowded market for shopping on the eve of Vijayadashami. Marigold flowers for sale in the second photo. esakal
जळगाव

Dussehra 2023 : दसऱ्याच्या मुहूर्तावर 1,500 वाहनांचे बुकिंग; सोन्यालाही वाढती मागणी

सकाळ वृत्तसेवा

Dussehra 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. मंगळवारी (ता.२४) दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

हा मुहूर्त साधत जळगाव शहरात सुमारे पंधराशे दूचाकी, चारचाकी वाहनांचे आरक्षण करण्यात आले आहे. (1,500 vehicles booked due to dussehra jalgaon news )

दोनशेच्यावर नागरिक नवीन घरात प्रवेश करतील, असे चित्र शहर व जिल्ह्यात आहे. यावेळी सणाच्या खरेदीसाठी पूर्वसंध्येला बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कापसासह नवीन हंगाम येत आहे. शेतकऱ्यांनी तो विकून दसरा सण साजरा करण्यावर भर दिला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हातात बोनस आला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार होण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी अनेकांनी बऱ्यापैकी खरेदी केले आहे. बहुतांश नागरिकांच्या हातात पैसा असल्याने वाहन मार्केट, कपडे मार्केट, सुवर्ण बाजारासह विविध वस्तू खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून मोठा उत्साह नागरिकांत आहे. विजयादशमी आनंदात जाण्यासाठी नवीन वस्तू खरेदी, सोने खरेदीवर, नवीन वास्तूत प्रवेशावर नागरिकांनी भर दिल्याचे चित्र दिसते.

वाहनांना मागणी

दुचाकी, चारचाकी घेऊन आपलेही स्वतःचे वाहन असावे असे प्रत्येकाला वाटते. यामुळे शहर व जिल्ह्यात सुमारे पंधराशे नागरिकांनी नवीन वाहनांचे आरक्षण करून ठेवले आहे. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर ते वाहन घरी नवीन सण साजरा करतील. यावेळी टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशिन, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, कपडे, लाईफस्टाईल साठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

व्यापाऱ्यांकडून विशेष योजना

दसरा, दिवाळीला नवीन वाहन खरेदी मोठी होते. ही संधी साधत खासगी कर्ज देणाऱ्या संस्थांनी कर्जाच्या विविध योजना राबवीत नागरिकांना वाहन घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. यामुळे अनेक जण कर्ज काढून नवीन वाहन खरेदी करीत आहे. विजयादशमीनिमित्त अनेकांनी खरेदीवर विशेष सूटही दिली आहे.

''दुचाकी, चारचाकी, ट्रक्टर, ट्रक खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. विशेष आर्थिक सूटही सणानिमित्त वाहन खरेदीवर दिली जात आहे. वाहन घेण्यासाठी कर्ज देणाऱ्या कंपन्याही आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक ग्राहकांनी वाहनांचे आरक्षण केले आहे.''-किरण बच्छाव, संचालक, सातपूडा ऑटोमोबाईल

झेंडूचे दर घसरले

विजयादशमीला झेंडूच्या फुलांचा उपयोग घर, दुकाने, कार्यालय सजविण्यासाठी होतो. यामुळे झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. गतवर्षी झेंडूचा दर ८० ते शंभर रूपयापर्यंत गेला होता. यंदा मात्र झेंडूंच्या फुलांची मोठी आवक झाल्याने दर चाळीस ते पन्नास रुपये किलो होते. सायंकाळी झेंडू वीस ते तीस रुपये किलोने विकले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT