Corona News Updates esakal
जळगाव

Jalgaon : जिल्ह्यात कोरोनाचे 16 सक्रिय रुग्ण

सचिन जाेशी

जळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुक्त झालेल्या जळगाव जिल्ह्यात आठवडाभरापासून दररोज नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून येत असून सक्रिय रुग्णांची संख्या आता सोळावर पोचली आहे. (16 active patients of Corona in district Jalgaon Corona updates News)

सौम्य स्वरूपाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मार्चपासून जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण अभावानेच समोर आले. सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर जाऊन जिल्हा कोरोनामुक्तही झाला. मात्र, आठवडाभरापासून पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या तीन दिवसांत दररोज दोन नवे रुग्ण व दोन बरे झालेले रुग्ण असे प्रमाण होते. मात्र सोमवारी या रुग्णांत ६ नव्या रुग्णांची भर पडून २ रुग्ण बरे झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता १६वर पोचली आहे. नव्या बाधितांमध्ये भुसावळला ३, यावल येथे २ व चोपड्यात १ असे रुग्ण आढळले.

गंभीर रुग्ण नाहीत

जिल्ह्यात सध्या १६ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी एकही रुग्ण गंभीर स्वरूपाचा नाही. आयसीयू, व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजनवरही एकही रुग्ण नाही. सर्व १६ रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT