Death News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 16 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मोहाडी (ता. जळगाव) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (ता. १६) रात्री कुटुंबियासोबत झोपली. अन्‌ पहाटे आईने बघितले, तर बेपत्ता झाली. दिवसभर ग्रामस्थ कुटुंब, नातेवाईक मुलीचा शोध घेत थकल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

रविवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामगील विहिरीत हरविलेल्या पुजाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पूजाचा मृतदेह बघातच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

मोहाडीतील रहिवासी भिमराव पवार यांची १६ वर्षीय मुलगी शुक्रवारी (ता. १६) रात्री अकराला जेवणानंतर कुटुंबियांसह घरात झोपली होती. पहाटे कुटुंबियाना जाग आल्यावर मात्र ती दिसली नाही. (16 year old girl Body Found in well Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

दिवस उजाडल्यावर अचानक मुलगी कुठे गेली याची शोधाशोध सुरू झाली. नातेवाइकांनी तिच्या सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही मिळून न आल्याने अखेर नातेवाइकांनी सायंकाळी पाचला एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. रविवारी (ता. १८) सकाळी ग्रामपंचायतीच्या मागील वापरत्या विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला.

ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. मृतदेह बाहेर काढल्यावर तो हरविलेल्या पूजाचाच असल्याचा कुटुंबियांनी ओळखले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात नेला. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपविण्यात आला. मुलीने स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली किंवा पडून गेली, याचा पोलिस शोध घेत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat : सलग सुट्ट्यांमुळे सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट जाम होणार? एकाच लेनमधून सुरू आहे वाहतूक, 'या' वळणावर अपघाताचाही धोका!

Kalyan-Dombivli Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जागा वाटपावरून युतीत अनिश्चिततेचे ढग; 73 जागांच्या मागणीने युतीत तणाव !

Panchang 26 December 2025: आजच्या दिवशी

वाहतूक समस्येला ‘लोकवैज्ञानिक’ पर्याय

Healthy Bengali Shukto: हलकी गोडसर चव, सुगंधी मसाले आणि पौष्टिक भाज्यांसह; हिवाळ्यासाठी तयार करा आरोग्यदायी बंगाली शुक्तो

SCROLL FOR NEXT