Arrest esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 16 वर्षीय मुलीला अनैतिक कृत्य करण्यास पाडले भाग; 3 भामट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय मुलीला अनोळखी लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी तीन भामट्यांना अटक केली आहे. (16 year old girl raped forced to commit immoral act 3 suspects arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

७ जानेवारीला सकाळी सातला नितू ऊर्फ जोया राजू बागडे (रा. जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार (दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलावून घेतले.

तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठविले. त्यानंतर १० जानेवारीला कपडे व मोबाईल घेऊन देण्याचे आमिष दाखवून त्या मुलीला चाळीसगावला नेले. तिथे २३ फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री पुन्हा सोड्यात नशेचे द्रव्य पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले.

पोलिस येणार असल्याचे सांगून तिघांनी तिला रेल्वेत बसवून जळगावला पाठविले. घाबरलेल्या अवस्थेत तिने हा प्रकार आईला सांगितले. पीडीत मुलीने आईसह दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नितू ऊर्फ जोया राजू बागडे, ज्योती सरदार आणि चंद्रकांत सरदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT