Dengue  esakal
जळगाव

Jalgaon Dengue Disease : शहरात डेंग्युसदृश्‍य 161 रूग्ण; 40 जणांचे अहवाल प्रतिक्षेत, काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Dengue Disease : पावसाळ्यामुळे साथीच्या रोगाची लक्षणे लक्षात घेवून महापालिकेच्या वैद्यकिय व आरोग्य विभागातर्फे तपासणी व सफाई मोहिम सुरू आहे.

यात शहरत विविध भागांत डेंग्युसदृश्‍य आजाराचे १६१ रूग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंधरा जण संशयीत असून, ४० जणांचे अहवाल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून येण्याच्या प्रतिक्षेत आहे.

शिरसोलीत युवकाच्या निधनामुळे जळगाव शहरातही महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अहवालानानुसार शहरात सुरू असलेल्या तपासणीत आठ रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याचे सागंण्यात आले. (161 patients of dengue like disease were found in different parts of city jalgaon news)

यात गणेशकॉलनी परिसर, मेहरूण, रायसोनीनगर, देवेंद्रनगर, निसर्ग कॉलनी (पिंप्राळा), हिराशिवा कॉलनी, प्रेमनगर, खोटेनगर या ठिकाणी प्रत्येकी एक रूग्ण आढळला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, १५ जण संशयीत आढळले असून, ४० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्याची प्रतिक्षा आहे.

आयोध्यानगरातही होते रूग्ण

गेल्या आठवड्यात शहरातील औद्यौगिक वसाहत भागात आयोध्यानगरातही डेंग्युचे रूग्ण आढळले होते. नगरसेवक विरेन खडके यांनी तातडीने त्याबाबत दखल घेवून महापालिकेतर्फे उपाययोजना केल्या होत्या.

उपाय योजना सुरू

डेंग्युच्या आजारामुळे शहरात तातडीच्या उपायोजना करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ॲबेटींग फवारणी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, शहरात १६१ ठिकाणी धुरळणी करण्यात आली. त्यात ३ हजार ३८१ घरांत धुरळणी करण्यात आली. तर १३० ठिकाणी अस्वच्छतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याचे निवारण करण्यात आले.

डासांची उत्पत्तीस्थान असलेल्या २३२ ठिकाणी फवारणी करण्यात आली. यात कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात आले. ८७ हजार २५ घरांना भेट देवून सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३ हजार ६०३ दूषित घरे आढळून आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१ लाख ९८ हजार १७६ पाण्याचे कंटेनर तपासण्यात आले. त्यापैकी ३ हजार ८६३ कंटेनर दूषित आढळले. २ हजार ७७१ कंटेनर रिकामे करण्यात आले, तर ८१ हजार ८०५ कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले.

काय घ्याल काळजी

डेंग्युचा आजार परिसरात पसरू नये यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू देवू नका. कूलर, फ्रिज, फुलदाण्या यातील पाणी आठवड्यातून एकदा साफ करा. घरगुती पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करा व घासून-पुसून घ्या. डासांपासून बचाव करण्यासाठी झोपताना अंगभर कपडे वापरा. शक्यतो मच्छरदाणी लावून झोपा. व्हेंट पाईपला जाळी बसवून घ्या. नारळाच्या कवट्या, तुटलेल्या प्लास्टीक बादल्या नष्ट करा.

"महापालिकेच्या वैद्यकीय पथकातर्फे शहरात आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कोणताही ताप आल्यास ताबडतोब आपल्या जवळच्या महापालिका किंवा खासगी रूग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. तातडीने उपचार घ्यावेत." -डॉ. राम रावलानी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका जळगाव

"डेंग्युसदृश्‍य साथीचे रोग पसरू नयेत यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात धुरळणी, फवारणी, तसेच ॲबेटींग करण्यात येत आहे. जनतेनेही आपल्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी."- उदय पाटील, आरोग्याधिकारी, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

त्या चर्चा खऱ्या ठरल्या! अद्वैत- कलाची जोडी तुटणार; ईशा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडणार, प्रोमो पाहून चाहते रडकुंडीला

SCROLL FOR NEXT