Suspects detained by local crime branch in animal theft case. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जनावरे चोरणाऱ्या टोळीकडून 18 गुन्हे उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी जनावरे चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. (18 crimes revealed by animal stealing gang Jalgaon Crime News)

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत जनावरे चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या सूचनेनुसार पथक तपासार्थ पाठविण्यात आले.

अशी मिळाली माहिती

या पथकास गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार धरणगाव येथील मोहंमद फयाज मोहंमद अयाज असून, तो अजिंठा चौफुली परिसरात स्कॉर्पियो गाडीसह (एमएच १२, बीव्ही ९४१५) दिसून आल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तातडीने त्याठिकाणी जात धनराज कार डेकोरसमोरून स्कॉर्पियोसह मोहंमद फयाजला (रा. कसाई वाडा, पाळधी) यास ताब्यात घेतले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

त्याची चौकशी करून वसीम मोहंमद अस्लम कुरेशी (रा. फरहान हॉस्पिटल, जळगाव), नईम शेख कलीम (रा. मासूमवाडी, जळगाव), जाफर गुलाब नबी (कसाईवाडा, पाळधी), हारुन उर्फ बाली शहा (रा. बारा फत्तर, धुळे), अर्शद (पूर्ण नाव नाही) (धुळे), मनोज ऊर्फ मोन्या विठ्ठल पाटील (सुरेशदादानगर, कुसुंबा, जळगाव) यांच्यासमवेत जनावरे चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्या माहितीवरून संशयित वसीम मोहंमद अस्लम कुरेशी व नईम शेख यांना ताब्यात घेतले. त्यांनी जिल्ह्यात जामनेर, भडगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, पारोळा आदी तालुक्यांत विविध १८ ठिकाणांहून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली.

तिघांना अटक

या संशयितांपैकी मो. फयाज, वसीम मो. अस्लम कुरेशी, व नईम शेख कलीम अशा तिघांना अटक करण्यात आली. त्यांना जामनेर पोलिस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी तेथे हजर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT