2 suspected corona patients in Chopda jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon COVID Update : चोपड्यात कोरोनाचे 2 संशयित रुग्ण; रॅपिड टेस्ट ‘पॉझिटिव्ह

शहरातील दोन महिला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असता त्यांना सर्दी, खोकला ही लक्षणे दिसून आल्याने त्यांची ‘कोरोना’ टेस्ट केली असता ते रॅपिड टेस्टमध्ये ‘पॉझिटिव्ह’ निघाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon COVID Update : शहरातील दोन महिला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असता त्यांना सर्दी, खोकला ही लक्षणे दिसून आल्याने त्यांची ‘कोरोना’ टेस्ट केली असता ते रॅपिड टेस्टमध्ये ‘पॉझिटिव्ह’ निघाले.

यामुळे दोन संशयित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती डॉ. सागर पाटील यांनी दिली.(2 suspected corona patients in Chopda jalgaon news)

शहरातील या दोन्ही महिलांची रॅपिड टेस्ट ‘पॉझिटिव्ह’ आली असून, ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी त्यांचे नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

शहरातील दोन रुग्ण संशयित सापडले असले तरी कोरोना विषाणूचा हा नवीन उपप्रकार ‘जेएन- १’ आहे की नाही, याची स्पष्टता होण्यास वेळ लागणार आहे. संबंधित महिलेचे नमुने तपासणीसाठी जळगाव प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यांची ऑक्सिजन लेव्हल सामान्य आहे.

राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार ‘जेएन-१’चे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील दोन्ही महिलांना सर्दी, ताप, खोकला जाणवत असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची रॅपिड चाचणी केली होती. या चाचणीत ते ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

काळजी घेण्याचे आवाहन

डॉक्टरांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढले असून, सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्णही वाढत आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गेल्यास अशा ठिकाणी ‘मास्क’चा वापर करावा. घाबरण्याचे कारण नाही; पण काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सागर पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT