Jalgaon Latest Accident News esakal
जळगाव

जळगाव : मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विटनेर गावाजवळ भरधाव मालवाहू गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत (Accident) मोताळा येथील दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाल्याची घटना घडली. तर मालवाहू गाडीतील तीन जण जखमी झाले आहे. (2 wheeler driver was killed on spot in pickup collision jalgaon Latest Accident News)

जळगाव तालुक्यातील विटनेर गावापासून चार किलोमीटर अंतरावर नेरीकडून एरंडोलकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जीजे ०५ बीटी ६४८९) ने समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वारास (एमएच २८ डब्ल्यू ९४४०) जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे (रा. चिंचखेडा, ता. मोताळा जि. बुलढाणा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. महिंद्रा पिकअप गाडी ही रस्त्याच्या चारीत पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

Boisar MIDC Accident : वटपौर्णिमेला एकत्र पुजला वड, दोन दिवसांतच नियतीचा क्रूर घाला! बोईसर एमआयडीसीत नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी अंत; कॉम्प्रेसरचा व्हॉल्व्ह उघडताना काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पूलाअभावी शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

भारतापासून सर्वात दूरचा देश! जगातील सर्वात रहस्यमय बेट, अंटार्क्टिका अन् वाळवंट... 'या' देशाने भारतीयांना दिलं खास आमंत्रण

IND vs ENG 2nd T20: संजूचा पत्ता कट? दुसऱ्या टी-20 आधी वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अपडेट! दुसऱ्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

SCROLL FOR NEXT