imprisonment order Jalgaon Crime latest News esakal
जळगाव

Jalgaon : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संशयितास 20 वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : डेराबर्डी (ता. चाळीसगाव) येथील सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्ष सश्रम कारावासासह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. बी. एस. महाजन यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (20 years imprisonment for girl child abuse suspect latest jalgaon crime news)

रवींद्र उर्फ रितेश बापू निकुंभ (रा. डेराबर्डी तालुका चाळीसगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात एकूण बारा साक्षिदारांची तपासणी करण्यात आली. खटला सुरु असताना पीडित मुलगी सज्ञान झाली.

दरम्यानच्या काळात तिचा विवाह झाला मात्र दीर्घ आजाराने तिचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे तिची साक्ष नोंदविण्याचे काम राहिले. या खटल्यात पिडीतेचे वडील, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केसवॉच म्हणून दिलीप सत्रे यांची मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT