2000 bunches of bananas were cut and thrown away by unknown jalgaon  esakal
जळगाव

Jalgaon News : केळीचे 2 हजार घड माथेफिरूने कापून फेकले

तालुक्यातील अट्रावल गावात कोणीतरी अज्ञात माथेफिरूने शेतकऱ्याचे कापणी योग्य झालेले केळी पिकाचे नुकसान केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील अट्रावल गावात कोणीतरी अज्ञात माथेफिरूने शेतकऱ्याचे कापणी योग्य झालेले केळी पिकाचे नुकसान केले आहे.

तब्बल दोन हजार केळीचे घड कापून नासधूस केल्याने शेतकऱ्याचे तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. (2000 bunches of bananas were cut and thrown away by unknown jalgaon news)

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अट्रावल (ता. यावल) येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांचे शेत गट क्रमांक ४५५ हे बटाईने केलेले आहे. या शेतात त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती व आता केळी कापणीवर आली आहे.

दोन महिन्यापूर्वीच त्यांनी तोंडी बोलणी करून कापणीवर आलेली केळीच्या व्यवहार व्यापाऱ्यासोबत केला होता व प्रती घड ५ हजार ५०० रूपयांत दिला होता व त्यातील दीड हजार घड कापणी देखील झाली होती तर उर्वरित केळीच्या घडापैकी २ हजार केळीच्या झाडावरील घड शुक्रवारी मध्यरात्रीनंतर माथेफिरूने त्यांच्या शेतात जाऊन कापून नासधूस केली.

यात शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चिंतामण तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT