death  esakal
जळगाव

Jalgaon News : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; नैराश्‍यातून जीवन संपविल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील कानळदा येथील २२ वर्षीय तरुणाने शेतातील चिकूच्या झाडाला शुक्रवारी (ता. २१) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. (22 year old youth committed suicide jalgaon news)

तालुक्यातील कानळदा येथील भिलवाड्यातील राहुल रवींद्र सोनवणे (वय २२) आईवडिल आणि लहान बहिणीसोबत वास्तव्याला होता. शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून काम नसल्याने राहुल घरीच होता. गुरुवारी (ता. २०) दुपारी चारला गावातील किरण नारायण राणे यांच्या शेतात गेला. शेतातील चिकूच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राहुल घरी आला नाही, म्हणून आईवडिल चिंतेत होते. त्यांनी त्यांचा शोध घेतला. अखेर शुक्रवारी सकाळी सताला किरण राणे यांच्या शेतातील चिकूच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी राहुल सोनवणेचा मृतदेह खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.

तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत तालुका ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृत राहुल सोनवणे यांच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील रवींद्र सोनवणे, दोन बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT