3 arrested from Madhya Pradesh for transporting 33 cattle in truck without license jalgaon crime news Esakal
जळगाव

Jalgaon News : ट्रकमध्ये कोंबून 33 गुरांची वाहतूक; श्वास गुदमरल्याने 13 जनावरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विना परवाना ३३ गुरांना पाय बांधून ट्रकमध्ये कोंबून घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली असून, ट्रक व १ लाख १३ हजार रुपयांची गुरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. (3 arrested from Madhya Pradesh for transporting 33 cattle in truck without license jalgaon crime news)

डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, संजय बोरसे, चंपालाल पाटील यांना परिमंडळ गस्त लावली होती. सावखेडा गावाजवळ मंगळवारी (ता. ११) पहाटे एकच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना ट्रक (आरजे ०९, जीडी ५८७६) उभा असलेला आढळून आला व चालकाला काही लोक मारत असल्याचे आढळून आल्याने अपघात झाला असावा म्हणून पोलिसांनी गाडी थांबवली.

त्यावेळी मारहाण करणारे अचानक पळू लागले. पोलिसांनी ट्रक पाहिला असता ट्रकमध्ये गुरे कोंबून भरली होती व त्यांचे पाय बांधलेले होते. चालकाला नाव विचारले असता त्याने रशीद नथेखा पठाण (वय ३५, रा. शेखा चौक मंदसौर, मध्य प्रदेश) असे सांगितले तर त्याच्यासोबत असणाऱ्यांनी दयाल देविदास बैरागी (वय ३८, रा. इंदिरा कॉलनी, मंदसौर मध्यप्रदेश) व मोहमद सद्दाम मोहम्मद बजारोद्दीन (वय २६, रा.पक्की बाग कॉलनी इटावा) असे नाव सांगितले तसेच त्यांच्याजवळ गुरे वाहतुकीचा कुठलाच परवाना नव्हता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोपड्यातून काही लोकांनी त्यांचा पाठलाग करून मारहाण सुरू केली होती. कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून लागलीच अमळनेर पोलिस ठाण्याहून पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निंबा शिंदे, पोलिस कर्मचारी संदेश पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, योगेश सोनवणे यांना बोलावण्यात आले.

जनावरांची सुटका

पंचनामा करून ट्रक व गुरे अमळनेर येथे आणण्यात आली. गुरांची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी करायला सांगितले असता गुदमरल्याने श्वास कोंडला जाऊन १३ गुरांचा मृत्यू झाला होता. सुमारे १ लाख १३ हजार रुपये गुरांची किंमत होती. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT