Police arrest esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घरफोडीच्या प्रयत्नातील तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंवरनगरात घरफोडी व चोरीच्या उद्देशाने दुचाकीवरून फिरणाऱ्या तीन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडील दुचाकी हस्तगत करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंवरनगरात शनिवारी (ता. २५) सायंकाळी सहाला नाकाबांदी करून वाहनांची तपासणी करीत असताना, ट्रीपलसीट दुचाकीने चोरी व घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद हालचाली करीत असल्याचे एमआयडीसी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अशोक पवार, सुधीर साळवे, श्रीकांत बदर, होमगार्ड रवींद्र पाटील यांनी तिघांना पाठलाग करून पकडले. चौकशीत रवी प्रकाश चव्हाण (वय १९, रा. तांबापुरा) आणि साईनगरात दोन अल्पवयीन मुले, असे तिघांची नावे निष्पन्न झाली. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

तिघांना ताब्यात घेऊन दुचाकी हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी शनिवारी (ता. २५) रात्री उशीरा पोलिस नाईक श्रीकांत बदर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT