Chopda Shetkari Sahakari Sugar Factory esakal
जळगाव

Chopda Sugar Factory : ‘चोपडा कारखान्या’कडे अडकले 3 कोटी 30 लाख; शेतकरी कृती समितीचे आत्मक्लेश उपोषण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २०१४-२०१५ ची ऊस बिलातील ठेव म्हणून ठेवलेली रक्कम १५० प्रतिटनप्रमाणे तीन कोटी ३० लाख रुपये तब्बल आठ वर्षे उलटूनही न मिळाल्याने शेतकरी कृती समितीचे सदस्य ११ सप्टेंबरपासून आत्मक्लेश आंदोलन व बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील यांनी दिली आहे. (3 crore 30 lakh not given by Chopda sugar factory to farmers jalgaon news)

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना वाचला तर तालुक्यातील अर्थव्यवस्था चांगली राहील व शेतकऱ्यांबरोबर कामगार यांच्यासह इतर किमान पाच हजार लोकांची उपजीविका कारखान्यावर चालते. यासाठी प्रत्येक वेळेस लढण्याची वेळ आली तर लढा व तडजोडीची वेळ आली तर माघार घेत शेतकरी कृती समितीने भूमिका घेतली आहे.

याबाबत उच्च न्यायालयाने दिलेले आदेशही थांबविण्याची भूमिका घेऊन सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे २०१४-२०१५ चे राहिलेले १५० प्रतिटनप्रमाणे तीन कोटी ३० लाख रुपये जून २०२३ मध्ये आपणास मिळाले, असे कारखान्याला लिहून दिले व त्याची ठेव केली तर कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाईल, असे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांनी तो निर्णय मान्य केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांची ही ठेव रक्कम जून २०२३ अखेर मिळणार होती. याबाबत बारामती ॲग्रोनेही सकारात्मक भूमिका घेतली. परंतु, कुणीतरी हा प्रश्न चिघळावा म्हणून बारामती ॲग्रो आणि संचालक मंडळ यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मिळण्यास विलंब होत आहे.

यावर कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांच्यासह शेतकरी आत्मक्लेश आंदोलन व बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षक, बारामती ॲग्रोचे कार्यकारी संचालक, चोपडा कारखान्याचे अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT