fund esakal
जळगाव

Jalgaon News : पाणीटंचाई निवारणासाठी तालुकास्तरावर ग्रामीण पाणीपुरवठाकडून 3 कोटी वितरित

जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी आणि उपाययोजनांसाठी तालुकास्तरावर तीन कोटी ३२ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी आणि उपाययोजनांसाठी तालुकास्तरावर तीन कोटी ३२ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीसगाव तालुक्याला एक कोटी अकरा लाखांचा, तर अमळनेर तालुक्याला एक कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.(3 crore distributed by rural water supply at taluka level to alleviate water scarcity jalgaon news)

टंचाई निवारण २०२२-२३ अंतर्गत २०२३-२४ साठी ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांसाठी हा निधी देण्यात आला आहे. प्रलंबित देण्याच्या अभिकरण योजनेच्या लेखाशीर्ष २२१५ ए, १९५ नैसर्गिक आपत्ती २०२३-२३ चे अनुदानाचा समावेश आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, कूपनलिका यासाठी निधी देण्यात आला आहे.

तालुकानिहाय वितरित निधी

(आकडे रुपयांमध्ये दर्शवितात)

० बोदवड : दोन लाख ५४ हजार

० रावेर : एक लाख २७ हजार

० चोपडा : दोन लाख ५० हजार

० यावल : चाळीस हजार

० पारोळा : तेरा लाख

० भडगाव : एकवीस लाख

० पाचोरा : एकवीस लाख

० जामनेर : ९५ लाख ५० हजार

० भुसावळ : सात लाख

० मुक्ताईनगर : आठ लाख

० जळगाव : एक लाख

० एरंडोल : ४६ हजार ८००

० धरणगाव : एक लाख ७५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT