Police Inspector Satish Gorade, Assistant Inspector Ganesh Ahire and police personnel along with the suspects in the burglary case. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घरफोडी प्रकरणातील 3 संशयिताना अटक; एरंडोल पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विवाहानिमित्त परगावी गेल्याचा फायदा घेत घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून अडीच लाख रुपये रोख व ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या तीन संशयिताना पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.

पोलिसांनी संशयितांकडून ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. (3 suspects arrested in burglary case in jalgaon crime news)

अटक करण्यात आलेले तिघेही संशयित कागदीपुरा भागातीलच असून, मालेगाव येथील आहे. संशयितांमध्ये सासरा व जावई यांचा समावेश असून, एका संशयिताचा विवाह पाच दिवसांपूर्वीच झाला आहे. दरम्यान, संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गांधीपुरा भागातील कागदीपुरा परिसरातील खालिद अहमद रफिक अहमद हे नातेवाईकाकडे विवाह असल्यामुळे अमरावती येथे गेले होते. विवाह कार्यक्रम आटोपून घरी आले असता त्याना घराच्या मागील दरवाजाला छिद्र पाडून आतील कडी उघडली असल्याचे दिसून आली. खालिद अहमद व परिवारातील सदस्यांनी घरातील लाकडी कपाट उघडे दिसले.

त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. खालिद अहमद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर घरफोडी प्रकरणातील संशयिताना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.

पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, हवालदार अनिल पाटील, सुनील लोहार, विलास पाटील, जुबेर खाटिक, अकिल मुजावर, प्रशांत पाटील, पंकज पाटील, हेमंत घोंगडे यांनी तपासाचे योग्य नियोजन करून कागदीपुरा भागातीलच फिर्यादीच्या घराजवळील आझाद शेख शब्बीर चौधरी (वय-२३), मेहंदी राजा शेख अली अहमद (वय-३५), कलीम शेख रहीम (वय-३७) यांना अटक केली.

अटक केलेल्या तिघाही संशयितानी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिली. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही मालेगाव येथील कलीम शेख याचा सासरा शेख आशिक शेख रमजान याच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी आझाद शेख शब्बीर चौधरी, मेहंदी रजा शेख अली अहमद, कलीम शेख रहीम या तिघांनाही अटक केली असून, चौथा संशयित शेख आशिक शेख रमजान हा फरार

झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तिघाही संशयिताना न्यायालयासमोर उभे केले असता तिघांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिला. पोलिसांनी संशयितांकडून सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख जप्त केले.

घरफोडी प्रकरणातील तीनही संशयित खालिद अहमद यांच्या घराजवळच राहणारे असून, त्यांनी खालिद हे परगावी गेल्याचे पाहून चोरी केली. संशयितांमध्ये आझाद शेख शब्बीर चौधरी याचा २५ नोव्हेंबरला विवाह झाला आहे. विवाह झाल्यानंतर संसारिक सुख पाहण्याऐवजी आझाद यास जेलची हवा खावी लागली आहे.

तसेच चौथा फरार संशयित शेख आशिक शेख रमजान हा गुन्ह्यातील संशयित कलीम शेख रहीम याचा सासरा असून, सासरा व जावयाने चोरीमध्ये सहभाग घेतला होता. पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा तपास करून चोरट्यांना अटक केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT