crime esakal
जळगाव

Jalgaon News : ठिबक साहित्य चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : खडकदेवळा बुद्रुक (ता. पाचोरा) येथील शेतशिवारातून ठिबक सिंचन नळ्या व पाइप (Pipe) चोरून नेणाऱ्या तिघांना रिक्षासह शेतमालकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (3 who stole drip irrigation pipes and pipes from farm were caught by farm owner along with rickshaw handed to police jalgaon news)

संतोष सूर्यवंशी यांचे गोंदेगाव रस्त्यावर शेत आहे. ते शेतात मंगळवारी पीक पाहणी करण्यासाठी गेले असता शेतात तीन अनोळखी व्यक्ती ठिबक सिंचनच्या नळ्या व पाइप गोळा करताना दिसले. शेतालगत (एमएच ०२, एएक्स ६९६०) रिक्षा उभी करून त्यात ठिबकचे साहित्य टाकले जात होते.

शेतमालकाने त्यांना जाब विचारला असता लघुशंकेसाठी थांबल्याचे त्यांनी सांगितले. परंतु रिक्षातील ठिबक नळ्या व साहित्य पाहून शेतमालकांनी आरडाओरड केली तसेच भ्रमणध्वनीवरून काही शेतकऱ्यांना कळविल्याने सोमनाथ मोरे, समाधान पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत ब्राह्मणे आदी शेतकरी धावून आले.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

या वेळी श्री. ब्राह्मणे यांच्या शेतातून देखील विजेची केबल व मोटार असा सहा हजार पाचशे रुपयांच्या माल चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ॲपेरिक्षासह पाचोरा येथे आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनी नसीर पठाण, पप्पू परदेशी, फिरोज पिंजारी अशी नावे सांगून मस्तान अली यांच्या मालकीची रिक्षा असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक सचिन निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

Pune Air Pollution: पुण्याच्या हवेत तासाला मिसळते ६ टन सिमेंट; आरोग्यासाठी गंभीर धोका

T20 World Cup: वानखेडेवर वेस्ट इंडिजचाच बोलबाला! भारतीय संघालाही जे करता आलं नाही, तो पराक्रम केलाय

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! योजनेचे अडकलेले हफ्ते लवकरच खात्यात जमा होणार; महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय, पण कोणता?

उड्डाणानंतर हवेतच विमानाचं इंजिन फेल, १५० प्रवाशांचा जीव टांगणीला; दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT