31.8 mm of rain in district in 24 hours Jalgaon Unseasonal Rain news  
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain: जिल्ह्यात 24 तासांत 31.8 मिलिमीटर पाऊस; गारपिटीने मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain : शहरासह जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने चाळीसगाव तालुक्याला मोठाफटका बसून कांदा, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बोदवड तालुक्यात आज जोराच्या पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३१ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (31.8 mm of rain in district in 24 hours Jalgaon Unseasonal Rain news)

नियमित पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. अपेक्षेपेक्षा खूप कमी उत्पादन शेतकऱ्याच्या हाती आले आहे. दुष्काळाची झळ पोचलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. दुष्काळ जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु आहे. असे असताना आता अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

असे झाले नुकसान

जळगाव, जामनेर, रावेर, सावदा, बोदवड, भुसावळ येथे जोरदार पावसाने केळी पिकांचे नुकसान झाले आहेत. चाळीसगाव तालुक्यात वीज पडून गायींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ३१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

प्राथमिक अंदाज असा

काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण, पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, तलोंदे प्र दे, काकडणे या गावात प्रामुख्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ५७५ शेतकऱ्यांचे ४१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खरिपातील कपाशी अद्यापही शेतात आहे.

काही ठिकाणी कपाशीला बोंडे फुटली आहे. त्यांचे काही नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. रब्बीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अतिशय कमी २४ टक्के केल्या आहे. अवकाळी पावसाने काही प्रमाणात शेतातील ओल वाढून रब्बीच्या पीक पेरण्यांना वेग येणार आहे. गहु, हरभरा, ज्वारी या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT