drowning  esakal
जळगाव

मासे पकडण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

रईस शेख

जळगाव : मासे पकडण्यासाठी तलावावर गेलेल्या जळके- वसंतवाडी येथील ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

संजय पंडित मोरे (रा. जळके) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळके वसंतवाडी (ता. जळगाव) येथील रहिवासी संजय मोरे हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास तो शिरसोली शिवारातील तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. तलावात गाळ असल्याने त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. इकडे संजय घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला.

मात्र, तो कुठेही आढळून आला नाही. बुधवारी (ता. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार जितेंद्र राठोड, जळके वसंतवाडीचे पोलिसपाटील संजय चिमणकारे, शिरसोली येथील पोलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून सायंकाळी सातला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईत, कसं असेल मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं स्वरुप? वाचा...

Pune News : 'तो' तरुण सिंहगडावरुन बेपत्ता झालाच नाही, प्रकरणाला वेगळं वळणं ; नेमकं काय घडलं?

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

Latest Marathi News Updates : फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

SCROLL FOR NEXT