कंपन्यांकडून ३६ जणांना ‘ऑन द स्पॉट जॉब’ sakal
जळगाव

कंपन्यांकडून ३६ जणांना ‘ऑन द स्पॉट जॉब’

भरारी फाउंडेशनतर्फे मेळावा; ‘गार्डियन’कडून १२ विद्यार्थी दत्तक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने बेरोजगारी वाढली. ही स्थिती लक्षात घेऊन भरारी फाउंडेशनने विविध कंपन्यांशी बोलून आज घडवून आणलेल्या ‘जॉब ऑन द स्पॉट’ या मेळाव्यात ३६ जणांना रोजगार मिळाला.

भरारी फाउंडेशनतर्फे आज गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे, शेतकऱ्यांना बी- बियाणे व खतांचे वाटप करणे यासाठी उपक्रम राबविला. शिवाय काही उद्योजकांना सोबत घेऊन हा रोजगार मेळावाही घेतला. दिवाळीनंतरच्या काळातही अशा गरजू व्यक्तींना भरारी फाऊंडेशन रोजगार उपलब्ध करून देणार आहे. उद्योजकांच्या हस्ते त्यांना तत्काळ नियुक्ती पत्रकाचे वाटप करण्यात आले. या वेळी ५९ कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

बारा विद्यार्थ्यांचे पालकत्व

‘गार्डियन’ संस्थेने कोरोना काळात पालकांचे छत्र हरवलेल्या १२ विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात कोरोना काळात कर्ता पुरुष गेलेल्या १५ विधवा महिलांना शेतीसाठी खते व बी- बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, के. के. कॅन्सचे रजनीकांत कोठारी, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, महिला बालकल्याण अधिकारी विजसिंह परदेशी, स्वरूप लुंकड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक परदेशी, सूत्रसंचालन व आभार रामचंद्र पाटील यांनी मानले. या वेळी रवी लढ्ढा, अमर कुकरेजा, नंदू अडवाणी, श्रीराम पाटील, अनिल भोकरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT