Crime News esakal
जळगाव

ATM Card बदलून घातला गंडा; तरुणाची 37 हजार 500 रुपयाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणाला अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डची अदलाबदली करून खात्यातून ३७ हजार ५०० रुपये काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हापेठ पोलिस गुन्हा दाखल झाला आहे. (37 thousand 500 rupees fraud of youth by stolen ATM Card Latest Jalgaon News)

विठ्ठल मेरचंद पवार (वय ३८, रा. गजानन महाराज मंदीर, सुप्रिम कॉलनी) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल पवार हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजळील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत आला होता.

बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे काढत असताना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल पवार याला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या एटीएमची अदलाबदली केली. त्यानंतर पैसे निघाले नाही, म्हणून विठ्ठल पवार बाहेर निघाला. थोड्यावेळानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३७ हजारर ५०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत विठ्ठल पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT