Jalgaon Mayor Jayashree Mahajan & Jalgaon Municipal Commissioner Vidya Gaikwad  esakal
जळगाव

प्रभाग समितीला खड्डे बुजविण्यासाठी 4 कोटी : आयुक्त विद्या गायकवाड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील विविध प्रभागांतील खड्डे बुजविण्यासाठी प्रभाग समितीला चार कोटी रुपये देण्यात येणार आहे. प्रत्येक समितीने एक कोटी रुपयांत त्यात प्रभागातील खड्डे बुजवायचे आहे. महापौरांनी हा प्रस्ताव आयुक्ताकडे दिला होता. आयुक्तांनी त्या प्रस्तावाला सकारात्मकता दाखवीत तो मंजूर केला असल्याची माहिती दिली. (4 crores to block potholes to Ward Committee approved by Commissioner Vidya Gaikwad jalgaon Latest Marathi News)

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्यासोबत विविध भागातली गल्लीतील रस्तेही खराब झाले आहेत. विविध प्रभागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी प्रभागनिहाय निधी देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली होती.

महापालिकेत चार प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक समितीला एक कोटी रुपये दिल्यास त्यातून त्या समितीतर्फे प्रभागातील रस्त्याची कामे करून घेता येणार असल्याचे मतही नगरसेवकांनी व्यक्त केले होते. याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी सकारात्मकता दाखवून निधी देण्याबाबत तयारी दाखविली होती.

महापौरांचा आयुक्तांकडे प्रस्ताव

महासभेत नगरसेवकांनी केलेल्या निधीच्या मागणीचा हा प्रस्ताव महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या समोर ठेवला व प्रत्येक प्रभाग समितीला प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी केली होती.

आयुक्तांनी दिली मान्यता

महापौरांच्या या प्रस्तावा आयुक्त विद्या गायकवाड यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रभागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीला एक कोटी रुपये वर्षासाठी मिळणार आहेत. त्यातून समितीने ही कामे करून घ्यावयाची, अशी माहितीही आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

मक्तेदाराने शिल्लक निधीतून मुख्य रस्त्याचे खड्डे बुजवावे

शहरातील मुख्य तसेच इतर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत विचारले असता, आयुक्त विद्या गायकवाड यांनी सांगितले, की शहरातील मक्तेदारांना खड्डे बुजविण्यासाठी निधी देण्यात आला होता. त्यांनी काही भागातील खड्डे बुजविले; परंतु पावसामुळे पुन्हा खड्डे झाले आहेत. त्यामुळे काही मक्तेदाराकडे निधी शिल्लक आहे, त्या निधीतून त्या मकतेदारांनी खड्डे बुजवावे, असे आदेश देण्यात आले आहे. याबाबत शहर अभियंता त्यावर लक्ष देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation:'जेवण घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी रोखली'; मुंबई येथे माजी आमदार विक्रम सावंत, पोलिसांच्यामध्ये वाद

१९ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकाची रेकॉर्ड ब्रेकींग फटकेबाजी; आंद्रे रसेलच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कोण? ‘भोसले’ आडनावामागची खरी कहाणी काय?

Sangli News:'शेळ्या राखण्यास गेलेल्या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू'; खैराव येथील दुर्दैवी घटना, सात तासांनंतर मृतदेह विहिरीतून बाहेर

Yogesh Alekari Video : जगसफारीचे स्वप्न भंगले! मुंबईच्या बाईकरची गाडी लंडनमधून गेली चोरीला, इमोशनल व्हिडिओ केला शेयर

SCROLL FOR NEXT