dengue sakal
जळगाव

Jalgaon Dengue Disease : अमळनेर तालुक्यातील 4 जणांना ‘डेंगी’ची लागण; व्हायरल विषाणू तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Dengue Disease : तालुक्यात ४ जणांना डेंगी आणि अनेक बालकांना व्हायरल विषाणू तापाची लागण झाल्याने शहराचे आरोग्य बिघडले आहे. खुल्या भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात डबके आणि तळे साचल्याने डास, कीटकांचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या पाच, सहा दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने शहरात ढेकू रोड, पिंपळे रोड परिसरात अनेक ठिकाणी पालिकेचे खुले भूखंड, नागरिकांचे रिकामे प्लॉट यात पाणी साचून राहिलेले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

आधीच अशा रिकाम्या जागेत गवत, काँग्रेस गवत, लहान झुडुपे वाढल्याने साप, विषारी कीटकांची भीती पसरली आहे.

पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पिंपळे रोडला स्वामी विवेकानंद नगरमध्ये भुयारी गटारीचे दूषित पाणी पिण्याच्या पाइपलाइनच्या व्हॉल्व्हच्या खड्ड्यामध्ये गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. नळाला पाणी आल्यावर मोटारी लावताच व्हॉल्व मधून साचलेले पाणी शोषले जात असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

"शहरात पिंपळे रोडवरील द्वारकानगरमध्ये ३१ वर्षाचे अधिकारी, ख्वाजानगरमधील ५ महिन्याची मुलगी, गजानननगर ११ वर्षांची मुलगी, टाकरखेडा येथे ९ वर्षांचा मुलगा यांना डेंगीची लागण झाली आहे. तर दोन रुग्ण बरे झाले आहेत." - डॉ. गिरीश गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अमळनेर

"शहरात पालिकेने १९० घरांची तपासणी केली असून, ४७६ कंटेनर तपासण्यात आले आहेत. ५३ कंटेनरमध्ये डेंगी डासाच्या अळ्या आढळून आल्या." - डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT