Police officers and staff while inspecting the spot esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : एकाच रात्री 5 दुकाने फोडली; पोलिसांसमोर चोरांचे खुले आव्हान

सकाळ वृत्तसेवा

जामठी (ता. बोदवड) : बोदवड तालुक्यातील जामठी येथे शुक्रवारी (ता.२८) एकाच रात्रीतून पाच दुकाने फुटल्याने खळबळ उडाली आहे. जामठी बाजारपेठेचे गाव असून, बसस्थानक परिसरातील पाच दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून, तर कुठे शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले आहे. तसेच तीन दुकानांत बसविलेले ‘सीसीटीव्ही’चे डिव्हिआर लांबविले आहेत. या घटना शनिवारी (ता. २९) पहाटे पावणेपाचच्या सुमारास उघडकीस आल्या.

जामठी येथून तीन किलोमीटरवर बेटावद बुद्रुक येथेही एक कृषी केंद्र, तर दूध डेअरी फोडल्याचे आढळून आले. अशी परिसरात एकूण सात दुकाने फोडल्याची माहिती उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून दुकानाची पाहणी केली.(5 shops broken into in one night Open challenge of thieves to police Jalgaon Crime News)

महाजन कृषी केंद्रातील कुणाल महाजन यांच्या फिर्यादीवरून २१ हजार ६०० रुपये रोख, तर साईराणा कृषी केंद्रातील सुरेंद्र पाटील यांच्या दुकानातून पाच हजारांची रोकड व पाच हजारांचा डिव्हिआर, तर ओम सदगुरू जनरल स्टोअरमधील सात हजार ५०० रुपयांचा एलएडी लाइट व इलेक्ट्रिक वायर बंडल व कॉस्मेटिक सामान संदीप माळकर यांच्या दुकानातून तर अमोल प्रोव्हिजन किराणा दुकानातील १९ हजारांचा मुद्देमाल, १४ हजारांची रोकड त्यात पाच हजारांचा डिव्हिआर, काशीनाथ तेली यांच्या दुकानातून लंपास केला.

तसेच संदीप महाजन यांच्या दुकानातून १३ हजारांचा मुद्देमाल व त्यात आठ हजारांची रोकड व पाच हजारांचा डिव्हिआर या पाचही दुकानांतून एकूण ७३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशानुसार सुधाकर शेजोळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT