Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime: जबरी लुटीतील 5 संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या भामट्यांचा शोध घेताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन वेगवेगळ्या पथकाने जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच संशयितांना अटक केली. (5 suspects arrested in forced robbery Jalgaon Crime)

रवंजा (ता. एरंडोल) येथून विठ्ठल साहेबराव देशमुख याला गुन्हेशाखेने अटक केली. त्याच्याकडून जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील जबरी लुटीचा गुन्हा उघडकीस आला. सहा हजारांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

चोरट्याला पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हेशाखेच्या दुसऱ्या पथकाने मालेगाव येथून इरफान ऊर्फ डोकोमो नाझीम अन्सारी, आरीफ इक्बाल शाह यांना अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली. दहा हजारांचा मोबाईल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईसाठी दोघांना मेहुणबारे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तिसऱ्या पथकाने शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील एजाज खान मजीद खान व फारूक रशीद शेख (रा. नागदुली, ता. एरंडोल) यांना अटक केली. त्या दोघांकडून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला.

१८ हजारांचा दोन मोबाईल हस्तगत केले. . दोघांना पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT