Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon News : चिमुरडीचा विनयभंग; आरोपीला 5 वर्षे सश्रम कारवास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगर परिसरातील चिमुरडीचा विनयभंग करणारा आरोपी शेख असिफ शेख नबी (वय २४, रा. शिवाजीनगर) याला जिल्हा न्यायालयाने (Court) पाच वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजारांचा दंड ठोठावला. (5 years rigorous imprisonment for accused of molesting a girl Jalgaon News)

१७ वर्षीय मुलगी ११ सप्टेंबर २०१८ ला घरी पायी जात असताना, शेख असिफ शेख नबी याने तिचा हात पकडून विनयभंग केला होता. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

खटल्याचे कामकाज विशेष पॉक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्राप्त पुरावे, साक्षीदारांच्या साक्षच्या आधारावर संशयित शेख आसिफ शेख नबी याच्याविरुद्ध आरोप सिद्ध होऊन न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी बाललैंगिक अत्याचार अधिनियमाच्या कलमानुसार पाच वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. याकामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

Leopard Attack: दुर्देवी घटना! 'पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू'; वडील अन् आईचा आक्राेश, जमावाने वन विभागाची गाडी जाळली

Akola News : “मी शौचास जाते, तुम्ही घरी जा”; शेजारच्या काकूंसोबत शेतात गेलेली अल्पवयीन तरुणी अचानक बेपत्ता, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar: अजितदादांची विजयी घोडदौड कायम! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोर

Kolhapur Old Video : कसं होतं 125 वर्षांपूर्वीचं कोल्हापूर? पाहा छत्रपती शाहूंच्या करवीर नगरीचा ऐतिहासिक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT