Bogus Seed esakal
जळगाव

बोगस बियाण्यांची कळंबू येथे 50 पाकिटे जप्त

बोगस बियाणे मोठ्या प्रमाणावर विक्रीला आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : कळंबू (ता. अमळनेर) येथे कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शेतात छापा टाकून सुमारे ६२ हजार ५०० रुपयांचे बोगस कापूस बियाणाचे ५० पाकिटे जप्त केली. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाला आहे.

तालुक्यात बोगस बियाणे मोठ्या प्रमाणावर विक्रीला आले आहे. त्यामुळे कृषी विभागाची बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर सुरवातीपासूनच करडी नजर ठेवली होती. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक संजय शेवाळे, कृषी सहाययक गणेश पाटील, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे व तालुका कृषी सहाय्यक विद्या पाटील यांना कळंबू (ता. अमळनेर) येथे बोगस कापूस बियाणे विक्रीसाठी आणून त्याचा साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने काल (ता. ९) सकाळी साडेअकराच्या सुमारास डमी ग्राहक म्हणून योगेश सूर्यवंशी (रा. फागणे) यांना कळंबू येथील राजेंद्र धोंडूसिंह राजपूत यांच्या घरी बियाणे विकत घेण्यासाठी पाठवले. राजेंद्र राजपूत याने बियाणे शेतातील खळ्यात आहे, असे सांगून योगेश सूर्यवंशीला सोबत घेऊन शेताकडे निघाले. मात्र, त्याला नवीन वाहन दिसल्याने संशय आला व त्याने तेथून पळ काढला. मात्र, कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने खळ्यात छापा टाकला असता, तेथील गोदामात दोन पोत्यामध्ये १ हजार २५० रुपयांचे एक पाकीट याप्रमाणे सुमारे ६२ हजार ५०० रुपयांचे ५० पाकीटे मिळून आली. याबाबत बियाणे अधिनियम १९६८ च्या कलमान्वये तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, महाराष्ट्र कापूस बियाणे कायद्यानुसार राजेंद्र राजपूतच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या संशयित राजपूतचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT