Jowar
Jowar  esakal
जळगाव

Jalgaon : चांगल्या पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात 50 टक्के वाढ अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या वर्षी हरभरा, दादरला चांगला दर मिळाला होता. यंदा १०९ टक्के पाऊस झाला आहे. सिंचन प्रकल्पात ९९ टक्के पाणी आहे. यामुळे रब्बीची पेरणी यंदा तीन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. गेल्या वर्षी हरभऱ्याला चार हजारांचा, तर दादरला तीन हजारांवर दर मिळाला होता. यामुळे यंदा हरभरा, दादरचा पेरा अधिक होणार आहे. रब्बीच्या पेरणीस सुरवात झाली असून, पंधरा हजारांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. जसजशी जमिनीतील ओल कमी होईल त्या प्रमाणात रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. (50 percent increase in rabi Crop is expected due to good rains Latest Jalgaon News)

खरिपाचा हंगाम आता पूर्ण होत आला आहे. परतीच्या पावसाने तब्बल महिनाभर उशिराने शेतकऱ्यांना पेरण्या कराव्या लागत आहेत. हरभऱ्याला गेल्या हंगामात चार हजारांचा दर मिळाला होता. उत्पादनही एकरी दहा क्विंटल आले होते. दादरलाही तीन हजार ते तीन हजार दोनशे असा दर मिळाला होता. यामुळे हरभरा, दादरचा अधिक पेरा करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

गव्हाला अधिक पाणी लागते. त्यामुळे आपल्या परिसरात गव्हाचा पेरा कमी होतो. त्याखालोखाल मक्याचा पेरा होतो. यंदा हरभऱ्याला हमीभाव पाच हजार ३००, तर गव्हाला दोन हजार ६०० दर जाहीर झाला आहे.

दादरलाही चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. सोबतच चारा म्हणूनही पीक कापणीनंतर दादरचा उपयोग करता येतो. सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

"चांगल्या पावसाने रब्बीचा फायदा होणार आहे. सरासरी दोन हेक्टरवर रब्बीचा पेरा होता. त्यात यंदा एक लाख हेक्टर पेरा वाढेल. हरभरा, दादर पिकांचा पेरा सर्वाधिक असेल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हमीभाव या पिकांना अधिक मिळाला आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड नोव्हेंबरअखेर टाकावी. यामुळे बोंडअळीचा धोका टळेल."

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

"परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापसाचे मोठे नुकसान केले आहे. आता रब्बीवर मदार आहे. दादर, हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. थंडीचा कडाका वाढेल अशी आशा आहे. शेतात ऑक्टोबर महिन्यात ओल असल्याने रब्बीची पेरणी करता आली नाही. आता पेरणीस सुरवात होईल."

-गणेश पाटील, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT