6 lakh stolen in house burglary jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बंद घरातून 6 लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील गोजोरे येथील चौधरी कुटुंब नातीला पाहण्यासाठी पुणे येथे गेले असता चोरट्यांनी संधी साधून घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोने- चांदीचे दागिने, बँकेचे पासबुक, असा सहा लाख १३ हजार सहाशे रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( 6 lakh stolen in house burglary jalgaon crime news )

तालुक्यातील गोजोरा येथे राहणाऱ्या मालती अभिमान चौधरी या आपले पती व विधवा मुलगी व तिच्या मुलांसह गुजरात येथे राहतात. हे संपूर्ण कुटुंब २६ रोजी मुलाला मुलगी झाल्यामुळे पुणे येथे नातीला बघण्यासाठी गेले होते.

दरम्यान, सोमवारी (ता. ७) शेजारी राहणारा चुलत भाऊ मयूर चौधरी याला घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे याबाबत मालती चौधरी यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली. सदरची माहिती मिळताच साकेगाव येथे राहणाऱ्या भाच्याला सर्व हकीकत सांगून पाहणी करण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगळवारी (ता. ८) सकाळी गोजोरे येथे घरी पोहोचल्यावर घराची पाहणी केली असता बेडरूममधील कपाटातील मुलीचे ठेवलेले दागिने व स्वतःचे दागिने असा सहा लाख १३ हजार सहाशे रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.

याप्रकरणी मालती अभिमान चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT