Instagram Cyber Crime News  esakal
जळगाव

Cyber Crime News : Instagramवर मैत्री करुन ग्रामीण तरुणीला सहा लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : इन्स्टाग्रामवर ओळख करून ‘तुला गिफ्ट पाठवतो’ असे सांगून तरुणीची तब्बल सहा लाख ४९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ५) सायंकाळी पाचला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे


यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय तरुणीशी ऑगस्ट २०२२ मध्ये डॉ. मार्क नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून मैत्री केली. (6 Lakhs rupees fraud with rural girl by making friend on instagram Jalgaon Cyber Crime News)

त्यानंतर त्याने तरुणीचा व्हॉट्‍सॲप नंबर मिळविला. त्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगून वेळोवेळी तरुणीकडून तब्बल सहा लाख ४९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागविले.

तसेच पैसे ऑनलाइन स्वीकारून कोणतेही गिफ्ट न पाठविता तरुणीची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या डॉ. मार्क नामक व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT