Jalgaon: Police party while seizing six and a half lakhs worth of ganja near Bhokar. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भोकर गावात 65 किलो गांजासह एकाला अटक; मध्य प्रदेशातून गांज्याची तस्करी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नाशिक परीक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरक्षक व तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने शनिवारी (ता. १७) रात्री भोकर ते गाढोदादरम्यान दुचाकीवरून गांजाची तस्करी करताना मुन्ना सतीलाल पावरा (वय ३२, रा. मालपूर, पो. विरवाडे ता. चोपडा) याला ६ लाख ६० हजारांच्या ६५ किलो गांजासह अटक केली.

शिरपूर येथून दुचाकीवरून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक पवार यांना दिली.(65 kg in village Bhokar One arrested with marijuana Marijuana smuggling from Madhya Pradesh Jalgaon News)

तालुका पोलिसांसह विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने भोकर ते गाढोदामार्गे धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. मध्यरात्री दुचाकी (एमएच १९, टी २१३०) वरून संशयित मुन्ना पावरा याला थांबविले.

त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या तीन गोण्यांमध्ये सुमारे सहा लाख ६० हजार रुपयांचा ६५ किलो गांजा मिळून आला. मुन्ना पावरा याला अटक केली असून, त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मध्य प्रदेशातून गावठी कट्टे, गांजा, गुटखा यांची तस्करी करण्यात येते. सातपुड्याच्या पर्वत रांगातून माल जळगाव, चोपडा, शिरपूरमार्गे धुळे, नंदुरबार आणि इतर ठिकाणी पाठविला जात असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT