Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : लॉटरी गल्लीत धाड; 68 हजारांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मध्यवर्ती जुने बसस्टॅण्डलगतच्या लॉटरी गल्लीत बेकादेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटर चालवले जात होते. (68 thousand cash seized from online lottery center jalgaon crime news)

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने या लॉटरी सेंटरवर अचानक धाड टाकून चार संगणकसंचासह ६८ हजार ६६० रुपयांचे साहित्य जप्त करुन चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक कुळकर्णी यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रविंद्र बागुल, रतन गिते, बशीर तडवी, उमेश भांडारकर, विलास पवार, योगेश बोरसे यांच्या पथकाने रात्री आठच्या सुमारास अचानक या लॉटरी सेंटरवर छापा टाकला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावेळी बाळू जाधवराव कोळी (वय ३२, रा. घार्डी, ता. जळगाव), अजय पंडीत कोळी (वय २३, रा. वाल्मीकनगर) यांच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून ४१ हजार ६६० रुपये रोख, सीपीयु, संगणक स्क्रीनसह ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर चिठ्ठ्या असा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस नाईक योगेश इंधाटे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT