Illegal sand transportation news esakal
जळगाव

Sand Transport News : आव्हाणे शिवारात वाळू उपसा करणारे 7 डंपर, 5 ट्रॅक्टर जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आव्हाणे शिवारातील गिरणा नदीपात्रात सायंकाळी सातच्या सुमारास अवैध वाळू भरणारे सात डंपर आणि पाच ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले.

आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात होती. या अवैध उपशामुळे महसूल प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. (7 dumpers 5 tractor seizing sand in Avhane Shivar Jalgaon Sand Transport News)

मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन करून प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान, सोमवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास आव्हाणे शिवारातील गिरणा नदीपात्रात डंपर आणि ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करणार असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावरून प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नदीपात्रात छापा टाकून वाळू भरण्याच्या प्रयत्नात असलेले सात डंपर आणि पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

ही कारवाई मंडलाधिकारी देवेंद्र चंदनकर, राहुल वाघ, तलाठी छाया कोळी, वाहनचालक मनोज कोळी यांनी केली. ताब्यात घेतलेली १२ वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात लावली जाणार असून, पंचनामा करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT