Electric Bike sakal
जळगाव

E Bike : पोलिसांना आता पर्यावरणपूरक ई-बाईक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पोलिस यंत्रणेकडे मोजकी वाहने असल्याने अनेकदा गुन्हे तपास व गस्त घालण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यावर उपाय म्हणून पोलिस विभागात तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सात ई - बाईक देण्यात आल्या आहेत. (7 e bikes were given to police station bhusawal jalgaon news)

महाराष्ट्रात भुसावळ तालुक्यात प्रथमच उपविभागातील पोलिस ठाण्यांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अशा प्रकारे सात ई - बाईकचे वितरण आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिसांना सुविधा मिळावी. तपास यंत्रणा लवकर कार्यान्वित व्हावी. इंधन खर्च कमी व्हावा. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यादृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्यात आली आहे. याचा पुढील आढावा घेतल्यानंतर राज्यातील इतर शहरात देखील अशा प्रकारे प्रयोग केला जाणार आहे. याद्वारे इंधनाचा खर्च कमी होईल. तसेच तपास यंत्रणा वेळेत कार्यान्वित होईल, असा विश्‍वास पोलिस दलाने व्यक्त केला.

उपविभागात बाजारपेठ पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे, शहर, नशिराबाद पोलिस ठाणे अशा चार पोलिस ठाण्यांचा यात समावेश आहे. चारही पोलिस ठाण्यांची हद्द मोठी असल्याने रात्रीची गस्त करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांकडे पुरेशी वाहने नसल्याने बऱ्याच भागांमध्ये चोरी, दरोडे, घरफोडी, खून अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हा प्रकार कुठेतरी थांबावा, यासाठी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ही संकल्पना उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे मांडली व त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक एम.राजकुमार जळगाव यांच्याकडे वर्ग केली. पोलिस अधीक्षकांनी देखील यात विशेष लक्ष देऊन ही सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, पोलिस दलात ही वाहने कार्यान्वित झाल्याने उपविभागातील गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्‍वास जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी व्यक्त केला. तर पोलिस दलांत वाहनांची संख्या कमी असल्यामुळे तपासात किंवा गस्तीवरील पोलिसांना अडथळे निर्माण होत होते. ही समस्या यातून काही प्रमाणात दूर होणार आहे, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार संजय सावकारे, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक विलास शेंडे, राहुल गायकवाड, गजानन पडघन यांची उपस्थिती होती.

आमदारांकडून वर्षभरापासून पाठपुरावा

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील पोलिस ठाण्यांना ई - बाईक मिळण्यासाठी पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शनिवारी (ता.६) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सात ई - बाईक वितरण करण्यात आल्या.

गस्तीवरील पोलिसांना सुविधा

भुसावळ उपविभागातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अवैध धंदे, सट्टा - पत्ते, अंमली पदार्थ विक्री, गुटखा वाहतूक होऊनही पोलिस प्रशासन मूग गिळत गप्पा बसून आहे. भरदिवसाही घरफोडी होत आहे. चोरीचे प्रमाण वाढत आहे. पोलिस प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याने गुन्हे वाढत आहे. या सर्व गोष्टींना अंकुश लावण्यासाठी तसेच रात्रीची गस्त वाढविण्यासाठी ई- बाईक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT