7 youths cheating with lure of railway jobs jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने 7 युवकांची फसवणूक; 20 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत लोहटार (ता. पाचोरा) येथील ७ तरुणांची २० लाख रूपयांत फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ येथील रेल्वे कर्मचारी प्रकाश सोनवणे यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी लोहटार येथील मोहन चौधरी यांनी तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, शेती व्यवसाय करून आम्ही उदरनिर्वाह करतो. (7 youths cheating with lure of railway jobs jalgaon crime news)

भुसावळ येथे रेल्वेत नोकरीस असलेले प्रकाश सोनवणे यांची मुलगी लोहटार येथे असल्याने त्यांचे येणे जाणे होते. त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली. त्यांचे व्याही हिलाल गायकवाड यांच्या मध्यस्थीने त्यांनी आमचा विश्वास संपादन केला. परंतु श्री. गायकवाड हे मृत झाले. प्रकाश सोनवणे यांनी तुमचा मुलगा सुरज यास रेल्वेत नोकरी लावून देतो.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी चांगली ओळख आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. माझ्यासह गावातील ६ तरुणांना देखील नोकरीचे आमिषाने विश्वासात घेऊन सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोहन चौधरी, राजाराम पाटील, आत्माराम चौधरी, नीलेश चौधरी, रावसाहेब पाटील यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख व मोतीलाल चौधरी आणि पंकज पाटील यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रोख स्वरूपात घेतले.

फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रकाश सोनवणे यांनी ७ जणांकडून २० लाख रुपये घेतले. नोकरी लागण्याच्या अपेक्षेने आम्ही सतत त्यांच्याशी संपर्क ठेवला. परंतु आजपर्यंत नोकरी नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे संपर्कात न राहणे, असा प्रकार केला.

त्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकाश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT