SSC-HSC Exam 2024 esakal
जळगाव

SSC-HSC Exam 2024 : परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थितीची अट शिथिल; बोर्डाचे शाळांना आदेश

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारीपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारीपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील हजेरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी असू नये, असा नियम आहे. (75 percent attendance requirement for exam is relaxed by board jalgaon news)

पण, काही अडचणींमुळे हजेरी कमी लागली असल्यास त्या विद्यार्थ्यांस परीक्षेसाठी परवानगी मिळावी म्हणून संबंधित शाळांनी हजेरी क्षमापित करण्यासाठी बोर्डाकडे प्रस्ताव पाठविणे जरुरी होते. मात्र आता बोर्डाने ७५ वरून ५० टक्के हजेरी मान्य केल्याने विद्यार्थ्यांसह शाळांना सोयीचे झाले आहे. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख जवळ आल्याने प्रात्यक्षिक परिक्षांचे साहित्य वाटप झाले आहे.

हजेरी क्षमापित करणे म्हणजे काय ?

बोर्डाच्या परिक्षेला बसण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची वर्षभरातील किमान ७५ टक्के (प्रथम सत्रातील शाळा सुरू झाल्यापासून १५ ऑक्टोबरपर्यंत व द्वितीय सत्रात २६ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंत) असणे बंधनकारक आहे. ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत हजेरी असलेल्यांना परिक्षेला बसू द्यावे किंवा नाही याबाबतचा प्रस्ताव संबंधित शाळेने बोर्डाच्या विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना पाठवायचा आहे.

त्यासोबत गैरहजेरीची कारणेही द्यावी लागतील. तर ६५ टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असलेल्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या अध्यक्षांना पाठवावे लागतात. त्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय तेच घेतात. बोर्डाच्या अध्यक्षांना संबंधित शाळांकडून पाठविलेली कारणे समाधानकारक वाटली तर ते संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी देतात. मात्र, आता बोर्डाने ५० टक्के हजेरी मान्य केली आहे. यामुळे वरील प्रकारचे पत्र देण्याची गरज राहणार नाही.

सरमिसळ पद्धतीमुळे चिंता वाढली

प्रचलित परीक्षा पद्धतीने एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच केंद्रावर एकामागे एक यायचे. त्यामुळे एकमेकांचे बघून उत्तरे लिहिण्याचे प्रकार व्हायचे. बोर्डाकडे या प्रकारच्या तक्रारी वाढल्यानंतर तक्रारीवर उपाययोजना म्हणून यंदापासून आता परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे.

त्यामध्ये एकाच शाळेतील मुले आता वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतील. विद्यार्थ्यांच्या समोरील व मागील विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमधील असणार आहेत. त्यामुळे अभ्यासात हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांबद्दल व शाळेच्या एकूण निकालाबद्दल आतापासूनच मुख्याध्यापक व विषय शिक्षकांना विशेषतः गणित, विज्ञान, इंग्रजी शिक्षकांची चिंता वाढली आहे.

बारावी, दहावी लेखी परिक्षेचे वेळापत्रक असे

यंदा बारावीची लेखी परिक्षा २१ फेब्रुवारीपासून सूरू होत आहे. २१ ला पहिला पेपर इंग्रजीचा आहे. वेळ अकरा ते दोन अशी आहे. २२ ला हिंदी, २३ला मराठी, २४ ला मराठी प्राकृत/संस्कृत, २६ ला वाणिज्य संघटन, २७ ला भौतिकशास्त्र, २८ ला गृहव्यवस्थापन, २९ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, २ मार्चला गणित, ४ ला बालविकास, कृषी विज्ञान, ५ ला सहकार, ६ मार्चला जीवशास्त्र विषयाचा पेपर आहे.

दहावीची लेखी परिक्षा १ मार्च पासून सूरू होत आहे. १ मार्चला (शुक्रवार) मराठीचा पेपर आहे. वेळ अकरा ते दोन अशी आहे. ७ मार्चला इंग्रजी, ९ ला हिंदी, १३ मार्चला गणित-१, पंधरा मार्चला गणित -२, १८ मार्चला सायन्स व टेक्नॉलॉजी -१, २० मार्चला- सायन्स व टेक्नॉलॉजी -२, २२ ला सोशल सायन्स-१, २६ ला सोशल सायन्स २ या विषयाचा पेपर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT