File photo esakal
जळगाव

Jalgaon News : ‘खरिपा’तील 80 टक्के कापूस पडून; 10 हजारांच्या दराची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खरीप हंगामातील कापूस अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. परिणामी, दरही नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला प्रतिक्विंटल दहा ते १३ हजारांचा दर कापसाला मिळालेला नाही. (80 percent of Kharif season cotton is still lying with farmers jalgaon news)

खरीप हंगामातील ८० टक्के कापूस अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून आहे. शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजावर व्याजात रोज वाढ होत आहे. मात्र, कापसाला दहा हजारांचा दर मिळत नाही, अन्‌ शेतकरी कापूस विकत नाही. त्यामुळे कर्जांचा डोंगर आपल्या डोक्यावर चढवित असल्याचे विदारक चित्र आहे.

‘पांढरे सोने’ म्हणून प्रख्यात असलेला कापसाकडे शेतकरी नगदी सोने म्हणून पाहतात. यामुळेच खरीप हंगामात कापसाचा सर्वाधिक पेरा होतो. यंदा ११० टक्के पेरा कापसाचा झाला होता. कारण मागील वर्षी टंचाईमुळे कापसाला १३ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही कापसाला मागणी राहील, दर किमान दहा हजार रुपये मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस पेरला. अतिवृष्टी झाली.

त्यानंतरही उत्पादनही चांगले आले. हंगाम येताना काही ठिकाणी कापसाला १५ हजार, १३ हजार व अकरा हजारांचा दर व्यापाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांना याच दराची अपेक्षा कायम राहिली. नंतर मात्र चांगला हंगाम हातात आला अन्‌ भाव आठ ते साडेआठदरम्यानच राहिले. दिवाळीत शेतकऱ्यांनी याच दरात काही प्रमाणात कापूस विकला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मात्र, किमान दहा हजारांचा दर मिळेल, या आशेने कापूस घरात साठविण्यात आला. सध्याही ८० टक्के कापूस शेतकऱ्यांचा घरात पडून आहे. कापसाचे उत्पादन घेताना झालेला खर्च कापूस विकून काढायचा, असे शेतकऱ्यांनी ठरविले होते. मात्र, दर दहा हजार नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस अद्यापपर्यंत विकलेला नाही.

५० जिनिंग बंद

बाजारात रोजची मागणी २० हजार गाठींच्या कापसाची आहे. मात्र, केवळ दोन हजार गाठींचा कापूस येत आहे. अजून किती दिवस कापसाचे दर कमी राहणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या.

आता त्यातील ५० जिनिंग बंद झाल्या आहेत, तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा कापसाचे उत्पादन जास्त असले, तरी ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापसाला दहा ते १३ हजारांचा दर होईल, तेव्हा कापूस विकू, अशी भूमिका शेतकऱ्यांची गेल्या चार महिन्यांपासून आहे. ती आजही कायमच आहे.

बाजारात कापूस नसल्याने कापसाअभावी जिनिंग मिल्स सुरू राहू शकत नाहीत. सध्या ज्या जिनिंग सुरू आहेत त्या एका पाळीत सुरू आहेत. एखाद्या जिनमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे.

दोनशे गाठी असूनही तयार करता येत नाही. अशीच स्थिती सर्व जिनिंग मिल्सची आहे. बाजारात येणारा कापूस बंद झाल्याने कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे.

मार्च महिन्यात खरिपातील कापूस विकला जाऊन शेतकऱ्यांच्या हातात रक्कम असते. त्यातून शेतकरी घेतलेल्या कर्जांची परतफेड करतो अन्‌ पुढील हंगामाच्या तयारीला लागतो. मात्र, कापसाला योग्य दर नसल्याने कापूस घरातच आहे. सावकारांसह इतरांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

दृष्टिक्षेपात...

*दरवर्षी होणाऱ्या कापसाच्या गाठींचे उत्पादन-- १८ ते २५ लाख गाठी
*गतवर्षी उत्पादित गाठी--नऊ लाख गाठी
*खंडीला मिळालेला दर--४० ते ५० हजार
*शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर--नऊ ते १३ हजार
*यंदा झालेले गाठींचे उत्पादन--सुमारे ७ लाख
*यंदाचा सध्याचा दर--७७०० ते ७८००

"शेतकऱ्यांनी कापसाला थोड्या थोड्या प्रमाणात विकावा. दराबाबत अद्याप काहीही सांगता येत नाही. कापूस घरात पडून दर्जा खालावतोय. वजन कमी होतो, याचाही विचार शेतकऱ्यांनी करीत कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा." -प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग, प्रेसिंग असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT