After removing the lump from the woman's stomach, while saying goodbye to her, Dr. Jaiprakash Ramanand etc. esakal
जळगाव

अबब! महिलेच्या पोटातून काढला 800 ग्रॅमचा गोळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत काय ? तर मग स्वतःची देखील काळजी नक्कीच घ्या... कारण, एका महिलेला पाळीव प्राण्यापासून पोट दुखण्याचा गंभीर आजार जडला आणि शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ८०० ग्रॅमचा मोठा गोळा काढण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) वैद्यकीय पथकाला यश आले. त्यामुळे महिलेला मोठे जीवदान मिळाले आहे. (800 gram lump removed from woman stomach at jalgaon Government Medical College Hospital jalgaon news)

भुसावळ येथील रशिदाबी गवळी (वय ४७) या महिलेस पोट दुखणे, अन्न पचन न होणे, उलटी मळमळ होणे, पोट फुगणे असे त्रास होत होते. तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून शल्यचिकित्सा विभागाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत अवघड शस्त्रक्रिया, रक्तस्राव होण्याचा धोका, रुग्णाचा जीव धोक्यात असूनही वैद्यकीय कौशल्य पणाला लावत शल्यचिकित्सा विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेनंतर महिला बरी झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. रुग्णावर उपचार करण्याकामी डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. महेंद्र मल, डॉ. सागर कुरकुरे, डॉ. विपीन खडसे, डॉ. सुनील गुट्टे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. ऋतुराज काकड, परिचारिका निला जोशी, सुरेखा महाजन व सहकार्यांनी सहकार्य केले.

महिलेस लिव्हरचा त्रास होता. लिव्हरच्या डाव्या बाजूस ८०० ग्रॅमचा मोठा गोळा दिसून आला. तो शस्त्रक्रियेवेळी काढण्यात आला. हा लिव्हरचा आजार इचायनोकोकोस या जंतूमुळे होतो. यामुळे हा लिव्हरचा जंतुसंसर्ग आजार मनुष्याला होतो. हा आजार पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून मानवी शरीराला होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT