ST BUS  Sakal
जळगाव

Jalgaon News : एसटीला रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट; एकाच दिवसात 86 लाखांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळ सध्या नफ्यात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत असतानाही लालपरी फायद्यात राहिली आहे. यामुळेच एसटीला रक्षाबंधनाचा मोठे गिफ्ट मिळाले असून, जळगाव विभागाला एकाच दिवसात ८६ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाची बस एकेकाळी आर्थिक डबघाईला गेली होती. डिझेलला लागणारा खर्चदेखील एका फेरीतून कधी निघत नव्हता. (86 lakhs income on raksha bandhan to st bus jalgaon news)

परंतु या लालपरीला आता चांगले दिवस आले असून, बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. यात रक्षाबंधन असल्याने बसला प्रवाशांची गर्दी अधिक होती. यामुळे एसटी महामंडळाला रक्षाबंधनाचा मुहूर्त चांगलाच लाभदायी ठरला आहे. जळगाव विभागातून नियमित होणाऱ्या फेऱ्यांपेक्षा जास्तीच्या फेऱ्यादेखील झाल्या आहेत.

रक्षाबंधनाची भेट

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. यातून २ लाख ५९ हजार २०३ प्रवाशांनी प्रवास केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे केवळ एकाच दिवसात एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाने आपल्या तिजोरीत सरासरी ८६ लाख ५३ हजार ५७७ रुपयांचे उत्पन्न पाडून घेतले आहे. रक्षाबंधननिमित्त अजून काही दिवस प्रवासी संख्या अधिक राहणार असल्याने वाढीव उत्पन्न देखील मिळेल.

दिवसभरात दीडशे जादा फेऱ्या

सण-उत्सवाच्या काळात नेहमीच जादा बसचे निययोजन आखले जात असते. त्यानुसार रक्षाबंधननिमित्तही जादा बसचे नियोजन होते. जळगाव विभागाच्या ११ आगारांतून रोज ४ हजार ३०० नियतके (बस फेऱ्या) होत असतात. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी १५० जादा बस फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमधून २ लाख ६७ हजार ५३२ किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

SCROLL FOR NEXT