Erandol Peoples Court
Erandol Peoples Court esakal
जळगाव

जळगाव : एरंडोलच्या लोकन्यायालयात 9 लाख 50 हजारांची वसुली

सकाळ वृत्तसेवा


एरंडोल (जि. जळगाव) : येथील न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांची वसुली झाली. लोकन्यायालयाचा फायदा तळागाळातील गोरगरीब नागरिकांना होत असल्याचे तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी सांगितले.

येथील तालुका विधी सेवा समितीतर्फे झालेल्या लोकन्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी अठरा प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली, तर ८३ वादपूर्ण प्रकरणे तडजोडीने निकाली काढून सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांची थकीत वसुली करण्यात आली. सौम्य शिक्षा असणारी १५ प्रकरणेही निकाली काढून ९८ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. राष्ट्रीय लोकन्यायालयात तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसह वीज वितरण कंपनी, भारत दूरसंचार निगम, सेंट्रल बँक, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा यांच्याकडील थकबाकीची प्रकरणे ठेवली होती. ॲड. पी. एस. बिर्ला, ॲड. व्ही. एन. पाटील यांनी पंच न्यायाधीश म्हणून काम पाहिले. प्रमुखपंच म्हणून न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी काम पाहिले. यशस्वितेसाठी वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड. एम. ओ. काबरे, सचिव ॲड. डी. बी. महाजन, ॲड. आल्हाद काळे, ॲड. आर. एम. दाभाडे, ॲड. पी. एस. बिर्ला, ॲड. आर. आर. सोनार, ॲड. ए. जे. सय्यद यांच्यासह वकील संघाचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT